Ukraine Boys Play football during Russia air strike siren  esakal
क्रीडा

रशियाच्या एअर स्ट्राईकला युक्रेनच्या तरूणांची 'किक'

अनिरुद्ध संकपाळ

रशिया आणि युक्रेनमध्ये (Russia Ukraine Conflict) गेल्या आठवड्यापासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला करत त्यांची अनेक शहरे आपल्या ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. रशियाची विमाने युक्रेनच्या शहरांवर एअर स्ट्राईक (Air Stike) करत आहेत. त्यामुळे या देशातील राजधानी कीवसह अनेक शहरात सातत्याने एअर स्ट्राईकचा सायरन (Air Stike Siren) वाजतो. या एअर स्ट्राईकचा सायरन वाजला की लोकांची आपला जीव वाचवण्यासाठी धडपड सुरू होते. तेथील लोक हातातील कितीही महत्वाचे काम असले तरी ते सोडून आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित आसरा शोधण्यासाठी पळत सुटतात.

मात्र युक्रेनच्याच डनिप्रो भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे. रशियाची फायटर जेट आकाशात घिरट्या घालत असताना काही मुले फुटबॉल (Football) खेळण्यात व्यग्र होते. एअर स्ट्राईकचा सायरन वाजला तरी त्यांनी आपले फुटबॉल खेळणे सुरूच ठेवले.

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून युक्रेनमधील सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा फटका युक्रेनमधली क्रीडा उपक्रमांनाही बसला आहे. देशातील सर्व क्रीडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. यात युक्रेन प्रीमियर लीगचा देखील समावेश आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशात मार्शल लॉ लागू केल्यानंतर या सर्व स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, सहा वारकरी जखमी

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT