ukrainian striker roman yaremchuk  Sakal
क्रीडा

VIDEO : युक्रेन स्ट्रायकरचा व्हिडिओ पाहाल तर डोळ्यात येईल पाणी!

सकाळ डिजिटल टीम

Russia-Ukraine Crisis : युक्रेन आणि रशिया यांच्यात मागील पाच दिवसांपासून युद्ध छेडले आहे. सध्याच्या घडीला युक्रेनला जगाच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. एका फुटबॉल सामन्यातही असेच चित्र पाहायला मिळाले. युक्रेनला समर्थन देण्यासाठी काही चाहते पोस्टर घेऊन स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आले होते. रविवारी झाल्यातील सामन्यात एक खास क्षणही अनुभवायला मिळाला.

बेनफिक (Benfica) आणि विक्टोरिया एससी (Vitoria SC) यांच्यात प्रीमियरा लीगा चा सामना रंगला होता. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले. बेनफिकाकडून युक्रेनचा स्ट्रायकर रोमन यारेमचुकला (Roman Yaremchuk) प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. पण तो बदली खेळाडू म्हणून 62 व्या मिनिटाला मैदानात उतरला. यावेळी फुटबॉल स्टेडियमवर उपस्थितीत असलेल्या चाहत्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याला प्रोत्साहन दिल्याचे पाहायला मिळाले.

यारेमचुकला दिला कर्णधारपदाचा मान

तो फक्त बदली खेळाडू म्हणून आला नाही तर बेनफिका संघाने कर्णधार वर्टोनघनच्या जागी यारेमचुकला मैदानात उतरवले. वर्टोनघन ज्यावेळी डग आउटपर्यंत पोहचला त्यावेळी त्याने कॅप्टन्सीचा बॅच काढून तो यारेमचुकच्या हाती बांधला. संपूर्ण जग युक्रेनसोबत असल्याचा संदेश फुटबॉलच्या मैदानातून देण्यात आला. यारेमचुक मैदानात उतरताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

रोनाल्डोनंही केले आहे युक्रेनचे समर्थन

सोशल मीडियाच्या माध्यमातून या सामन्याचे फोटो व्हायरल हतो आहेत. सामन्याच्या निकालही बेनफिकाच्या बाजूनले लागला. डार्विन नुनेज याने दोन गोल डागले तर गोन्सालो रामोसने एक गोल केला. बेनफिका संघाने विक्टोरियाला 3-0 असे पराभूत केले. पोर्तुगाल आणि मँचेस्टचर युनायटेडचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोनंही युद्ध थांबवा, असे म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून शांतीचा संदेश दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

SCROLL FOR NEXT