India vs Australia Umesh Yadav sakal
क्रीडा

IND vs AUS : तब्बल 43 महिन्यांनंतर टीम इंडियात उमेश यादवची एन्ट्री

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी शमीऐवजी उमेश यादव संधी देण्यात आली आहे.

Kiran Mahanavar

India vs Australia Umesh Yadav :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची टी-20 मालिका 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधला पहिला टी-20 सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ मोहालीला पोहोचले आहेत. स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडला. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज उमेश यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. उमेश यादव तब्बल 43 महिन्यांनंतर टी-20 संघात खेळताना दिसणार आहे. ही मालिका त्याच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे.

उमेश यादव ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मालिकेसाठी रविवारी सकाळी चंदीगडला पोहोचला. तो नुकताच इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळून आला आहे. जिथे त्याने चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतरच निवडकर्त्यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. उमेश यादवने त्याचा शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना फेब्रुवारी 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. तो कसोटी संघात टीम इंडियाचा भाग आहे, परंतु टी-20 आणि एकदिवसीय संघात त्याला स्थान मिळवता आलेले नाही.

वेगवान गोलंदाज उमेश यादव टीम इंडियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने भारतासाठी 52 कसोटी सामन्यात 158 विकेट्स, 75 एकदिवसीय सामन्यात 106 बळी आणि 7 टी-20 सामन्यात 9 बळी घेतले आहेत.

T20 मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon ZP Election : आरक्षणाचा पेच कायम; जिल्‍हा परिषद निवडणुका दिवाळीनंतरच? सर्वोच्‍च न्‍यायालयात सुनावणीने लांबणीवर, नव्‍याने निघणार आरक्षण

भाजप आमदाराच्या कार्यालयात बॅगेत आढळलं पिस्तुल, कुणी आणि कशासाठी आणलं?

Valentine Day 2026: व्हॅलेंटाईन डे नंतर कोणते 'डे' येतात? कसा साजरा केला जातो, जाणून घ्या लिस्ट

Narhari Zirwal : पीएने लाच घेण्यास सांगितल्याचा आरोप, मंत्री नरहरी झिरवाळ सकाळपासून 'नॉट रिचेबल; राज्याच्या राजकारणात खळबळ!

CM Yogi Adityanath: योगींचा नवा अवतार! अर्थसंकल्प मांडताच बदलला सोशल मीडियाचा फोटो; ब्रह्मोस मिसाइलसोबतचा तो फोटो काय सुचवतोय?

SCROLL FOR NEXT