Umran Malik Deliver Fastest Ball In ODI  esakal
क्रीडा

Umran Malik : उमरान मलिकने वनडेतही रचला इतिहास; कोणाला जमलं नाही ते करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Umran Malik Deliver Fastest Ball In ODI : भारताने श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे मालिकेत 373 धावांचा डोंगर उभरला. यानंतर श्रीलंकेचे पहिले तीन फलंदाज स्वस्तात माघारी धाडत भारताने सामन्यावर आपली पकड निर्माण केली. यात मोहम्मद सिराजच्या 2 तर उमरान मलिकच्या एका विकेटचा समावेश होता. उमरानने फर्नांडो (5) आणि मेंडीस (0) यांना बाद केल्यानंतर सेट झालेल्या चरिथ असलंकाला उमरान मलिकने आपल्या दुसऱ्या षटकात 23 धावांवर बाद केले. याच षटकात विकेटबरोबरच उमरानने एक इतिहास देखील रचला.

उमरान मलिक आपल्या दुसऱ्या आणि संघाच्या 14 व्या षटकात 156 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला. या चेंडूने इतिहास घडवला. कारण हा कोणत्याही भारतीय गोलंदाजाकडून टाकण्यात आलेला सर्वात वेगवान चेंडू ठरला. याचबरोबर भारताकडून वनडे, टी 20 आणि आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणारा गोलंदाज म्हणून सगळीकडे उमरानचेच नाव लागले.

भारताकडून सर्वात वेगवान चेंडू

वनडे - 156 किमी प्रती तास - उमरान मलिक

टी 20 - 155 किमी प्रती तास - उमरान मलिक

IPL - 157 किमी प्रती तास - उमरान मलिक

भारताने पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेसमोर 50 षटकात 7 बाद 373 धावा उभारल्या. भारताकडून विराट कोहलीने 87 चेंडूत 113 धावा ठोकत सलग दुसरे शतक ठोकले. मात्र सलामीवीर रोहित शर्माला आपले शतक पूर्ण करता आले नाही. तो 67 धावात 83 धावा करून बाद झाला. या दोघांपाठोपाठ शुभमन गिलने देखील 70 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून कुसल रजिथाने 10 षटकात 88 धावा देत 3 बळी टिपले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT