Umran Malik esakal
क्रीडा

Umran Malik : स्पीडस्टारला अलगद उचलून बाहेर फेकलं... माजी क्रिकेटपटू निवडसमितीवर जाम भडकला

अनिरुद्ध संकपाळ

Umran Malik Indian Cricket Squad : भारताचा दक्षिण अफ्रिका दौऱ्यावरील संघ जाहीर होऊन आता बरेच दिवस झाले. मात्र संघ निवडीवरून सुरू असलेली चर्चा अजून काही संपलेली नाही. आता भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्राने भारताचा स्पीडस्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या उमरान मलिकला संघात स्थान न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

आकाश चोप्राला ज्या प्रकारे उमरान मलिकला अलगद संघातून बाहेर काढण्यात आले त्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. उमरान मलिक फक्त भारताच्या मुख्य संघातूनच नाही तर त्याचा भारत अ संघातून देखील डच्चू देण्यात आला आहे.

आकाश चोप्राला त्याच्या यूट्यूब चॅनलवर उमरान मलिकला टी 20 वर्ल्डकप संघात स्थान मिळावे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आकाश चोप्राने युवा स्पीडस्टारला अजून खूप काम करावं लागणार हे मान्य केलं. मात्र त्याला भारतीय अ संघात देखील स्थान मिळालं नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.

तो म्हणाला, 'उमरान मलिक हा काही महिन्यापूर्वी भारतीय संघात होता. वेस्ट इंडीज मालिकेत खेळला आणि त्यानंतर तो कुठे दिसेनासाच झाला. त्याला भारतीय संघातून दुधातून माशी काढून टाकावी तशा पद्धतीने बाहेर करण्यात आलं. मला माहिती आहे की हे योग्य उदाहरण नाही मात्र तुम्हाला याची गंभीरता लक्षात येईल.'

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, 'तीन महिन्यापूर्वी भारतीय संघात असलेला खेळाडू भारतीय अ संघात देखील दिसत नाहीये हे कसं शक्य आहे. माझ्या मते हे खूप चुकीचं आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Awade : माजी मंत्री प्रकाश आवाडेंच्या मनातलं ओठावर आलं, खासदारकी लढवण्याचे दिले संकेत; आवाडे म्हणाले...

Sharad Pawar : ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Yashasvi Jaiswal : 'जर कोणी हद्द पार करत असेल, तर...', हर्षा भोगलेंच्या व्हिडिओवर जैस्वालची तिखट कमेंट; नेमकं काय घडलंय?

Marathi News Live Updates : यवतमाळमध्ये रस्त्याचे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वणी बांधकाम विभागात नागरिकांचे ठिय्या आंदोलन

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

SCROLL FOR NEXT