umran malik shatters jasprit bumrah record  
क्रीडा

IND vs SL: उमरानच्या एकाच चेंडूत लंकेचा कर्णधार बाद झाला... सामना हातात आला अन् बुमराह देखील मागं पडला

उमरान मलिकने 155 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि...

Kiran Mahanavar

India vs Sri Lanka 1st T20 : भारतीय युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक त्याच्या वेगासाठी ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये आपल्या वेगानं सगळ्यांना प्रभावित केलं आहे. भारतीय संघात त्याला म्हणूनच आणलं आणि इथेही तो तशीच गोलंदाजी करत आहे. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात उमरान मलिकने आपल्या वेगवान गोलंदाजीने अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रमही मोडीत काढला आहे. उमरानने 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला बाद केले.

उमरान मलिकला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने ही निवड योग्य ठरवली. त्याने 4 षटकात केवळ 27 धावा देत 2 बळी घेतले. भारताच्या आवाक्याबाहेर सामना जात असताना त्याने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाची विकेट घेतली. उमरानने 155 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून त्याला आश्चर्यचकित केले.

यासोबतच उमरान मलिकने जसप्रीत बुमराहचा मोठा विक्रमही मोडला आहे. आता तो भारतीय गोलंदाजांमध्ये सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम जसप्रीत बुमराहच्या नावावर होता ज्याने 153.36 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली होती. याशिवाय मोहम्मद शमीने 153.3 आणि नवदीप सैनीने 152.85 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी केली. उमरान मलिक आता या सगळ्यांच्या पुढे गेला आहे. भारतीय संघाने हा सामना दोन धावांनी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT