Under 19 World Cup 2024  esakal
क्रीडा

World Cup 2024 : भारतातील ODI वर्ल्डकप संपल्यानंतर महिन्याभरातच श्रीलंकेत सुरू होणार अजून एक वर्ल्डकप

अनिरुद्ध संकपाळ

Under 19 World Cup 2024 : 'आयसीसी'कडून पुढल्या वर्षी (२०२४) श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वकरंडकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. गतविजेता भारतीय संघ सलामीला बांगलादेश संघाचा सामना करील. १३ जानेवारीला या स्पर्धेचा श्रीगणेशा होईल, तर ४ फेब्रुवारीला विजेतेपदाचा निर्णय होणार आहे.

१९ वर्षांखालील क्रिकेट करंडकात पहिल्याच दिवशी तीन लढतींचा थरार रंगणार आहे. यजमान श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यासह न्यूझीलंड- नेपाळ व इंग्लंड-स्कॉटलंड या दोन लढतीही पार पडणार आहेत. भारताचा सलामीचा सामना १४ जानेवारीला बांगलादेशविरुद्ध होणार असून, त्यानंतर १८ जानेवारीला अमेरिका आणि २० जानेवारीला आयलंड या देशांशी दोन हात करावे लागणार आहेत.

श्रीलंकेत आयोजित करण्यात येणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वकरंडकात १६ देशांमध्ये जेतेपदाची झुंज लागणार आहे. १६ देशांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे.

गटवारी :

अ गट - भारत, बांगलादेश, अमेरिका, आयर्लंड

ब गट - इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, स्कॉटलंड

क गट - ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, नामिबिया

ड गट - अफगाणिस्तान, पाकिस्तान, न्यूझीलंड, नेपाळ

भारताच्या लढती :

14 जानेवारी - बांगलादेश

18 जानेवारी - अमेरिका

20 जानेवारी - आयर्लंड

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; आता रकमेची मर्यादा नव्हे सातबाराच होणार कोरा! राज्यातील २४.७३ लाख शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई! स्वयंघोषित ‘दादा’ 8 दिवसांसाठी होणार तडीपार; महापालिका निवडणुकीपूर्वी ‘या’ गुन्हेगारांची पोलिस ठाण्यांकडून मागविली माहिती

Morning Breakfast Recipe: कुठल्याही पूर्वतयारीशिवाय १५ मिनिटांत सकाळी नाश्त्यात बनवा पेरी पेरी कबाब, सोपी आहे रेसिपी

अग्रलेख - शेजारचा आजार

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT