Modi Govt to ask BCCI to stop showing tobacco ads during cricket match.jpg Esakal
क्रीडा

Ban On Tobacco Ads: क्रिकेट मैदानावरील तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती बंद होणार? मोदी सरकार उचलणार मोठे पाऊल

BCCI: अलिकडील काही महिन्यांमध्ये बॉलिवूड कलाकार आणि माजी क्रिकेटपटू धूरविरहित तंबाखू उत्पादन निर्मात्यांद्वारे निर्मित ‘इलायची’ माऊथ फ्रेशनर्सच्या जाहिराती करताना दाखवण्यात येत आहे.

आशुतोष मसगौंडे

बॉलिवूड कलाकार आणि माजी क्रिकेटपटू करत असलेले तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती क्रिकेटचे सामने सुरू असताना मैदानात लावू नये अशी विनंती केंद्रीय आरोग्य मंत्रालय बीसीसीआयला करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अलिकडील काही महिन्यांमध्ये बॉलिवूड कलाकार आणि माजी क्रिकेटपटू धूरविरहित तंबाखू उत्पादन निर्मात्यांद्वारे निर्मित ‘इलायची’ माऊथ फ्रेशनर्सच्या जाहिराती करताना दाखवण्यात येत आहे.

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि व्हायटल स्ट्रॅटेजीज या जागतिक आरोग्य संस्थेने मे महिन्यात ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे नमूद केले आहे की, 2023 मध्ये धूम्रपानरहित तंबाखू (SLT) ब्रँडच्या सर्व जाहिरातींपैकी तब्बल 41.3% जाहीराती एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील शेवटच्या 17 सामन्यांदरम्यान प्रदर्शित केल्या गेल्या होत्या.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) क्रिकेटच्या मैदानावर माजी क्रिकेटपटू आणि बॉलिवूड सेलिब्रिटी करत असलेल्या 'गुटखा'च्या सरोगेट जाहिराती दाखवणे थांबवावे यासाठी विनंती करणार आहे.

अनेक क्रिकेट मैदाने आयपीएल सारख्या लोकप्रिय स्पर्धांचे आयोजन करताना पान मसाला आणि गुटख्यासह धुरविरहित तंबाखू उत्पादनांच्या जाहिराती प्रदर्शित करतात.

आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत आरोग्य सेवा महासंचालनालय बीसीसीआयला तंबाखूचा प्रचार करणाऱ्या जाहिरातींचे प्रसारण थांबविण्यास सांगणार आहे.

“तरुणांमध्ये क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहेत. क्रिकेट सामन्यांदरम्यान सरोगेट स्मोकलेस तंबाखूच्या जाहिराती प्रदर्शित केल्या जात आहेत आणि यामध्ये सेलिब्रिटींना दाखवले जात आहेत. यामुळे तरुणांना त्याकडे अप्रत्यक्षपणे आकर्षित केले जात आहे. आरोग्य मंत्रालयाचे डीजीएचएस बीसीसीआयशी संपर्क साधून त्यांना तंबाखूशी संबंधित जाहिराती दाखवणे थांबवण्याचे आवाहन करू शकतात,” असे नाव न सांगण्याची विनंती करत एका अधिकाऱ्याने सांगितले.

भारताने धूरविरहित तंबाखू उत्पादनांचा वापर रोखण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारला आहे, परंतु यासाठी आणखी काही उपाययोजना आणि तंबाखूच्या जाहिरातीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

विशेष म्हणजे, तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यापासून वाचण्यासाठी तंबाखू उत्पादक कंपन्या गुटख्याची ‘पान मसाला’ म्हणून जाहिरात करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT