क्रीडा

गोवा सिग्नल, बेळगाव उपांत्यफेरीत

सकाळवृत्तसेवा

गडहिंग्लज - येथील नगर परिषद आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असणाऱ्या नगराध्यक्ष युनायटेड चषक अखिल भारतीय स्पर्धेत तिसऱ्या दिवशी सिग्नल गोवा, बेळगाव फ्रेंड्‌स संघांनी उपांत्यफेरीत प्रवेश केला. सॅट केरळ, दिल्ली रेल्वे संघाचे आव्हान संपुष्टात आले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर प्रकाशझोतात ही स्पर्धा सुरू आहे.

चुरशीच्या सामन्यात बेळगावच्या फ्रेंड्‌सने केरळच्या सॅट क्‍लबला चार-तीन असे नमवून धक्कादायक विजयाची नोंद केली. आठव्याच मिनिटाला केरळच्या युनूसने गोल करून संघाचे खाते उघडले. अठराव्या मिनिटाला बेळगावच्या भरवशाचा खेळाडू किरण चौकशीने मैदानी गोल करून एक-एक अशी बरोबरी साधली. केरळच्या मध्यरक्षक नितीनच्या स्वयंगोलमुळे सॅट पुन्हा पिछाडीवर दोन-शून्य असा गोलफरक झाला. अठ्ठाविसाव्या मिनिटाला बेळगावच्या आमिल बेपारीने उत्कृष्ट गोल करून संघाला तीन-एक अशी आघाडी मिळवून दिली. केरळच्या रशिदने बेळगावचा गोलरक्षकला चकवून गोल करीत सामना तीन-दोन असा केला.

बेळगावच्या किरणने पुन्हा चढाई करून मैदानी गोल करीत सामन्यात चार-दोन अशी निर्णायक आघाडी मिळविली. उत्तरार्धात केरळ संघाला किमान अर्धा डझन सोप्या संधी मिळूनही दिशाहीन फटक्‍यामुळे गोल करता आला नाही. पाच मिनिटे शिल्लक असताना केरळच्या युनूसने केलेल्या गोल संघाचा पराजय टाळू शकला नाही. 

गोव्याच्या सिग्नल क्‍लबने दिल्लीच्या नॉर्थन रेल्वेला तीन-शून्य असे हरवून आगेकूच कायम ठेवली. सुरवातीपासून आघाडी घेण्यासाठी धडपडणाऱ्या गोव्याला दिल्लीच्या अरमिंदरसिंग, गोलरक्षक सोनू नीतेश चिका यांनी भक्कम बचाव करून रोखले. २३ व्या मिनिटाला गोव्याच्या नुकूलसिंगने अचूक गोल करून संघाचे खाते उघडले. यानंतर सिग्नलच्या खेळाडूंनी छोट्या पासेसचा वापर करून सामन्यावर वर्चस्व मिळविले.

२८ व्या मिनिटाला गोव्याच्या निम भुतियाने मध्य क्षेत्रातून चेंडू घेत उत्कृष्टपणे बचावफळीला गुंगारा देऊन सुरेख गोलची नोंद केली. त्यानंतर पाठोपाठ भुतियानेच वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा गोल करून पूर्वार्धातच तीन-शून्य अशी मजबूत आघाडी केली. उत्तरार्धात दिल्लीच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, गोव्याच्या चांदसिंग, विष्णू क्षेत्री, अमितसिंग, गोलरक्षक विक्रमजित यांनी त्यांच्या चढाया हाणून पाडल्या. त्यामुळे तीन-शून्य याच गोलफरकावर गोवा सिग्नल उपांत्यफेरीत दाखल झाला. उद्या (ता. १९) दुपारी चारला पहिला, तर सायंकाळी सहाला दुसरा उपांत्यफेरीचा सामना होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT