UPW vs RCB WPL 2023 Royal Challengers Bangalore won after 5 losses Beat Warriorz By 5 Wickets Smriti Mandhana cricket news in marathi kgm00
UPW vs RCB WPL 2023 Royal Challengers Bangalore won after 5 losses Beat Warriorz By 5 Wickets Smriti Mandhana cricket news in marathi kgm00  
क्रीडा

UPW vs RCB WPL : सलग पाच पराभवांनंतर बंगळुरूने उधळला विजयाचा गुलाल!

Kiran Mahanavar

UPW vs RCB WPL 2023 : गेल्या 12 दिवसांत सलग 5 पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अखेर महिला प्रीमियर लीगमध्ये प्रथम विजयाचा गुलाल उधळला. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यूपी वॉरियर्सचा पाच गडी राखून पराभव केला आणि स्पर्धेतील पहिला विजय मिळवला. यापूर्वी बंगळुरू मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स (दोनदा), गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सकडून पराभूत झाले होते.

आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यूपीचा संपूर्ण संघ 19.3 षटकात 135 धावांत गारद झाला. संघाकडून ग्रेस हॅरिसने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 32 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. त्यांच्याशिवाय किरण नवगिरेने 22(26) आणि दीप्ती शर्माने 22(19) धावा केल्या.

बेंगळुरूकडून अॅलिस पेरीने सर्वाधिक ३ बळी घेतले. त्यांच्याशिवाय सोफी डिव्हाईन आणि आशा शोभनाने 2-2 तर मेगन शट आणि श्रेयंका पाटील यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळुरू संघाची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. कर्णधार स्मृती मानधना पुन्हा एकदा अपयशी ठरली आणि खाते न उघडताच बाद झाली. संघाकडून कनिका आहुजाने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 30 चेंडूंत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 46 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय, यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोषने 32(31)* धावांचे योगदान दिले आणि हिदर नाइटने 24(21) धावांचे योगदान दिले आणि 18 षटकांत 5 गडी राखून 136 धावा करून सामना जिंकला.

यूपी वॉरियर्सकडून दीप्ती शर्माने दोन विकेट घेतल्या. सोफी एक्लेस्टोन, देविका वैद्य आणि ग्रेस हॅरिस यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT