Rishabh Pant Esakal
क्रीडा

Rishabh Pant: ‘स्वत:ची किंमत..’, पंतसाठीच्या पोस्टमुळे ट्रोल झाल्यानंतर उर्वशीच्या आईची नवी पोस्ट चर्चेत

क्रिकेटर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाचा धावा करत

सकाळ डिजिटल टीम

Rishabh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत लवकर बरा व्हावा म्हणून चाहते देवाचा धावा करत आहे. यासगळ्यात ऋषभची मैत्रीण उर्वशी रौतेलाच्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष आहे. आता उर्वशीच्या आईनं ऋषभ पंतसाठी खास पोस्ट शेयर केली होती.

मीरा रौतेला यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सोशल मीडियावर ज्या काही अफवा आहेत त्याचा कोणताही परिणाम ऋषभवर होणार नाही. ऋषभ तू कोणतीही काळजी करु नको. तुला आणखी खेळायचे आहे. उत्तराखंडचे नाव जगात मिरवायचे आहे. तेव्हा सिद्दबली बाबा तुझ्यावर कृपा करतील. हीच त्यांच्याकडे प्रार्थना असे मीरा यांनी म्हटले होते. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना या पोस्टनंतर खूप ट्रोल करण्यात आलं.

आता त्यांनी पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर आणखी एक पोस्ट लिहित टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. स्वत:चा फोटो पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘जर स्वत:ची किंमत माहीत असेल तर दुसऱ्यांनी केलेली निंदा आपल्याला स्पर्शही करू शकत नाही.’

ऋषभ पंतची आज शस्त्रक्रिया होणार आहे. दुखापतीवरील शस्त्रक्रियेनंतर तो अनिश्चित काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने बुधवारी दिली आहे. बीसीसीआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेतून मुंबईला आणण्याचा निर्णय घेतला कारण, कोणत्याही व्यावसायिक विमानातून प्रवास करण्याच्या स्थितीत नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT