tennis champion daniil medvedev 
क्रीडा

गतविजेत्या मेदवेदेवची आगेकूच

अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम : सेरेनाचीही आगेकूच

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : रशियाचा अव्वल दर्जाचा टेनिसपटू आणि गतविजेता डॅनिल मेदवेदेव याने अमेरिकन ओपन या प्रतिष्ठेच्या ग्रँडस्लॅममधील पुरुषांच्या एकेरीची तिसरी फेरी गाठली. त्याने गुरुवारी पहाटे झालेल्या लढतीत फ्रान्सच्या आर्थर रिंडरनेच याच्यावर दमदार विजय साकारत पुढे पाऊल टाकले. ४० वर्षीय सेरेना विल्यम्स हिनेही दुसऱ्या फेरीचा अडथळा ओलांडला, हे विशेष.

मेदवेदेव याने पहिल्या फेरीत स्टीफन कोझलोव याला हरवून घोडदौड केली होती. दुसऱ्या फेरीत त्याने आपला सदाबहार फॉर्म कायम राखला. मेदवेदेवच्या झंझावाती खेळासमोर आर्थरचा निभाव लागला नाही. मेदवेदेव याने ही लढत ६-२, ७-५, ६-३ अशी २ तास व ११ मिनिटांमध्ये जिंकली. आता मेदवेदेवसमोर चीनच्या वु यिबिंग याचे आव्हान असणार आहे. वु पहिल्यांदाच अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅमच्या तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे. त्याने दुसऱ्या फेरीत न्यूनो बोर्जेस याच्यावर पाच सेटमध्ये ३ तास व ४६ मिनिटांमध्ये विजय मिळवला व पुढल्या फेरीत वाटचाल केली.

तिसरी मानांकित सक्कारी पराभूत

तिसरी मानांकित ग्रीसची टेनिसपटू मारिया सक्कारी हिला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये बुधवारी मध्यरात्री पराभव पत्करावा लागला. चीनच्या वँग शिऊ हिने महिला एकेरीच्या लढतीमध्ये सक्कारी हिला हरवण्याची किमया साधली. तिने सक्कारीचे आव्हान ३-६, ७-५, ७-५ अशा तीन सेटमध्ये परतवून लावले. सक्कारीचा २ तास व ४४ मिनिटांमध्ये पराभव झाला.

गॉफ, कीज, आंद्रेस्क्यू विजयी

महिला एकेरीत स्टार खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना हरवत अमेरिकन ग्रँडस्लॅममध्ये पुढे वाटचाल केली. कोको गॉफ, मेडिसन कीज, बियांका आंद्रेस्क्यू व ओन्स जॅब्यूएर यांनी दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करीत अजिंक्यपद पटकावण्याची आशा कायम ठेवली.

मरेचा संघर्षपूर्ण विजय

युनायटेड किंगडमच्या अँडी मरे याने संघर्षपूर्ण विजय मिळवला. त्याने अमेरिकेच्या इमिलियो नवा याच्यावर ५-७, ६-३, ६-१, ६-० असा चार सेटमध्ये विजय साकारला. मरेला विजयासाठी तीन तासांची वाट बघावी लागली.याशिवाय निक किर्गीओस, मॅटियो बेरेट्टिनी, पाब्लो कॅरेनो बुस्टा व डॅनियल गलान यांनीही पुरुषांच्या एकेरीत कूच केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT