us open 2023 alcaraz downs zverev to complete all star semifinal lineup sakal
क्रीडा

US Open 2023 : अल्काराझ-मेदवेदेवमध्ये उपांत्य झुंज; झ्वेरेव, रुबलेवचे आव्हान संपुष्टात

अल्काराझ याने जर्मनीच्या ॲलेक्झँडर झ्वेरेव याच्यावर, तर मेदवेदेव याने आंद्रेय रुबलेव याच्यावर विजय साकारत अंतिम चारमध्ये प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : पहिला मानांकित कार्लोस अल्काराझ व तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव या दिग्गज टेनिसपटूंनी अमेरिकन ओपन टेनिस या ग्रँडस्लॅममधील पुरुषांच्या एकेरीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अल्काराझ याने जर्मनीच्या ॲलेक्झँडर झ्वेरेव याच्यावर, तर मेदवेदेव याने आंद्रेय रुबलेव याच्यावर विजय साकारत अंतिम चारमध्ये प्रवेश केला.

अल्काराझ-मेदवेदेव या दोन माजी विजेत्यांमध्ये उपांत्य फेरीची लढत रंगणार आहे. ॲलेक्झँडर झ्वेरेव आणि यानिक सिन्नर यांच्यामध्ये अंतिम १६ फेरीची लढत रंगली. ही लढत झ्वेरेव याने चार सेटमध्ये जिंकली, पण झ्वेरेवला विजयासाठी संघर्ष करावा लागला.

त्याने चार तास व ४१ मिनिटांमध्ये विजय मिळवला. मात्र या लढतीतील थकवा उपांत्यपूर्व फेरीत दिसून आला. स्पेनचा स्टार टेनिसपटू अल्काराझ याने झ्वेरेव याचे आव्हान ६-३, ६-२, ६-४ असे तीन सेटमध्ये परतवून लावले. अल्काराझ याने दोन तास व ३० मिनिटांमध्ये विजयाला गवसणी घातली. अल्काराझ याने मागील वर्षी ही स्पर्धा जिंकली होती.

डॅनिल मेदवेदेव-आंद्रेय रुबलेव या दोन मित्रांमध्ये उपांत्यपूर्व फेरीची लढत पार पडली. अपेक्षेप्रमाणे मेदवेदेव याने रुबलेव याच्यावर तीन सेटमध्ये मात केली. मेदवेदेव याने रुबलेव याची घोडदौड ६-४, ६-३, ६-४ अशी दोन तास व ४८ मिनिटांमध्ये रोखली. मेदवेदेव याने २०२१ मध्ये या स्पर्धेच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती.

सबलेंका-मेडिसनमध्ये रंगत

महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दुसरी मानांकित एरिना सबलेंका व १७ वी मानांकित मेडिसन कीज या खेळाडू आमने-सामने येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pak Rapper Indian Flag : पाक रॅपरने शो मध्ये फडकवला 'तिरंगा'! पाकिस्तानात संतापाची लाट, व्हिडिओ व्हायरल, काय घडलं नेमकं?

WPL 2026 Date: मोठी बातमी! महिला प्रीमियर लीग २०२६ कधीपासून सुरू होणार? तारीख आली समोर

नॅशनल क्रश झाल्यानंतर दोन दिवसात गिरीजा ओकचे किती फॉलोवर्स वाढले? आकडा वाचून भुवया उंचावतील

१० वी पास...१० वर्षांचा प्रिटिंगचा अनुभव...YouTube बघून तयार केल्या बनावट नोटा अन्...; पठ्ठ्याची करामत वाचून व्हाल थक्क

Mumbai News: मुंबईला जागतिक दर्जाचे टनेल मत्स्यालय मिळणार! कुठे अन् कधी पूर्ण होणार? बीएमसीने संपूर्ण योजना सांगितली

SCROLL FOR NEXT