Rohan Bopanna enter US Open 2023 men's doubles finals 
क्रीडा

US Open 2023: रोहन बोपण्णाचा विश्वविक्रम, वयाच्या 43 वर्षी रचला इतिहास... US Open जिंकण्यापासून एक पाऊल दूर

Kiran Mahanavar

Rohan Bopanna enter US Open 2023 men's doubles finals : यूएस ओपन 2023 मधून भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन यांनी गुरुवारी यूएस ओपनच्या पुरुष दुहेरीची अंतिम फेरी गाठली.

यासोबतच रोहन बोपण्णाने विश्वविक्रम करत इतिहास रचला आहे. रोहनपूर्वी या वयात (43 वर्षे 6 महिने) इतर कोणत्याही पुरुष खेळाडूने (एकेरी किंवा दुहेरी) खुल्या युगात ग्रँडस्लॅम अंतिम फेरी गाठली नाही. एकूणच रोहनची अंतिम फेरी गाठणे ऐतिहासिक आहे.

रोहन आणि एबडेन यांनी फ्रेंच जोडीवर सरळ सेटमध्ये विजय नोंदवला. बोपण्णा कारकिर्दीत दुसऱ्यांदा ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारण्यात यशस्वी ठरला आहे. सहाव्या मानांकित भारतीय-ऑस्ट्रेलियन जोडीने यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली होती.

या जोडीने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत फ्रेंच जोडीचा 7-6 (7-3), 6-2 असा पराभव केला. बोपण्णा ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे, त्याने शेवटचा 2010 मध्ये त्याचा पाकिस्तानी साथीदार इसम-उल-हक कुरेशीसह यूएस ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यानंतर कुरेशीसह रोहनची जोडी ब्रायन बंधूंकडून हरली.

रोहन बोपण्णा शुक्रवारी कारकिर्दीतील दुसरा ग्रँडस्लॅम फायनल खेळणार आहे. तो ग्रँडस्लॅम फायनल हार्ड कोर्टवर खेळेल हा योगायोग आहे.

रोहन बोपन्ना 2017 मध्ये फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीचा चॅम्पियन आहे, परंतु बोपण्णाने अद्याप एकही ग्रँडस्लॅम पुरुष दुहेरीचे विजेतेपद जिंकलेले नाही. 43 वर्षे आणि सहा महिने वयाचा, रोहन बोपण्णा खुल्या युगात ग्रँड स्लॅम अंतिम फेरीत पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. त्याने कॅनडाच्या डॅनियल नेस्टरचा विक्रम मोडला, जो 2016 ऑस्ट्रेलियन ओपनचा अंतिम सामना खेळला तेव्हा 43 वर्षे आणि चार महिन्यांचा होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT