Usman Khawaja ICC Controversy esakal
क्रीडा

Usman Khawaja : उस्मान ख्वाजा पुन्हा आयसीसीला भिडला; आता शूजवर लिहिलं...

उस्मान ख्वाजा पॅलेस्टिनवरून आयसीसीशी भिडतोय

अनिरुद्ध संकपाळ

Usman Khawaja ICC Controversy : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलियात होत असलेल्या या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. दुसरा सामना आजपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सुरू झाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा पहिल्या कसोटीत वादग्रस्त ठरला होता. त्याने आयसीसीची परवानगी न घेता पॅलेस्टाईनच्या समर्थनात काळी पट्टी घालून मैदानावर उतरला होता. त्यानंतर त्याला आयसीसीने फटकारले होते. आता दुसऱ्या कसोटीत उस्मान ख्वाजाचा शूज चर्चेत आला आहे.

दुसऱ्या कसोटीत उस्मान ख्वाजा आपल्या मुलांचे नाव लिहिलेला शूज घालून मैदानात उतरला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. उस्मान ख्वाजाने दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी आपल्या बॅटवर इस्रायल - हमास यांच्यातील युद्धासंदर्भातील संदेश लिहिलेले स्टीकर बॅटवर लावण्याची परवानगी मागितली होती.

मात्र आयसीसीने त्याला अशी कोणताही परवानगी दिली नाही. त्यानंतर ख्वाजा आपल्या मुलांचे नाव शूजवर लिहून मैदानात उतरला. याची परवानगी ख्वाजाने आयसीसीने घेतली नाही.

ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान दुसऱ्या कसोटीबाबत बोलायचं झालं तर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजाने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करून दिली.

या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची सलामी दिली. मात्र वॉर्नर 38 धावा करून बाद झाला. उस्मान ख्वाजाने 42 धावा केल्या. पावसामुळे सामना काही काळ थांबला. 45 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 118 धावा झाल्या होत्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीत मोठी घसरण! सलग पाचव्या दिवशी सोनं स्वस्त; आजचा भाव किती?

PMC Decision: पुणे महापालिकेचा निर्णय! महिलांना करात ५० टक्के सवलत, ५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मिळणार लाभ, काय आहेत अटी व शर्ती?

Latest Marathi News Live : शहादाच्या प्रकाशा येथे अवैध एचटीबीटी कापूस बियाण्यांवर कारवाई

Ration Scam : ठराविक रेशन दुकानदारांना जास्तीचे धान्य; कोट्यवधींचा अपहार, दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

लग्न करुनही जॅकी-रकुल 'सिच्युएशनशिप'मध्ये! अभिनेता म्हणाला...'मी बायकोपासून एक्स गर्लफ्रेंडचा...'

SCROLL FOR NEXT