Venkatesh Prasad on T20 World Cup Team India Squad News Marathi sakal
क्रीडा

Team India Squad : हार्दिक पांड्याला टी-20 वर्ल्ड कपमध्ये नाही मिळणार संधी? माजी मुख्य निवडकर्त्याने केलं आश्चर्यकारक विधान

T20 World Cup Team India Squad : भारतीय निवड समिती इंडियन प्रीमियर लीगवर लक्ष ठेवून आहेत. कारण या महिन्याच्या अखेरीस टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे.

Kiran Mahanavar

Venkatesh Prasad on T20 World Cup Team India Squad : भारतीय निवड समिती इंडियन प्रीमियर लीगवर लक्ष ठेवून आहेत. कारण या महिन्याच्या अखेरीस टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. या स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्यांना या मेगा आयसीसी स्पर्धेत खेळण्याची संधी मिळू शकते.

दरम्यान भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसादच्या एका सल्ल्याने सोशल मीडियावर चाहते दोन गटात विभागले आहे. कारण त्याने हार्दिक पांड्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान न मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दिग्गज क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद यांच्या मते, संघात हार्दिक पांड्याला संघात स्थान मिळू शकत नाही. टीम मॅनेजमेंटमध्ये सर्वात जास्त चर्चा विकेटकीपर बॅट्समनची असेल. व्यंकटेश प्रसाद हे स्वतः मुख्य निवडक राहिले आहेत, त्यामुळे त्यांचा सल्ला गांभीर्याने घेतला जाऊ शकतो.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत व्यंकटेश प्रसाद यांनी लिहिले की, “माझ्या मते, शिवम दुबेला फिरकी गोलंदाजीविरुद्ध चांगली कामगिरी केल्याबद्दल, सूर्यकुमार यादवला जगातील सर्वोत्तम टी-20 फलंदाज म्हणून आणि रिंकू सिंगला उत्कृष्ट फिनिशर म्हणून निवडले पाहिजे. या 3 खेळाडूंना वर्ल्ड कपसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाल्यास भारतीय संघासाठी चांगले होईल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या उपस्थितीत केवळ एका यष्टीरक्षक फलंदाजाची जागा रिकामी राहणार आहे. निवड कशी होते हे मनोरंजक असेल."

यंदाचा टी-20 वर्ल्ड कप यूएसए आणि वेस्ट इंडीजमध्ये खेळला जाणार आहे. आणि हा महाकुंभ 1 जूनपासून सुरू होणार आहे. आयसीसीने वर्ल्ज कप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्याची अंतिम तारीख 1 मे निश्चित केली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात बीसीसीआय वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, असे सांगण्यात येत आहे.

त्याच वेळी 25 मे पूर्वी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांना त्यांच्या संघात फक्त एक बदल करण्याची परवानगी असेल. सध्या निवड समिती खेळाडूंच्या आयपीएल कामगिरीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आयपीएल 2024 मधील खेळाडूंच्या कामगिरीवर निवडकर्ते लक्ष ठेवून आहेत, त्यामुळे अजित आगरकरसह इतर निवडकर्ते या सल्ल्याचे पालन करतात की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT