Venkatesh Prasad  esakal
क्रीडा

Venkatesh Prasad : 'तेथे मंदिर बांधणार...'; प्राण प्रतिष्ठापूर्वी माजी क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल

Kiran Mahanavar

भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी रविवारी त्याच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर असे लिहिले, ज्याची बरीच चर्चा होत आहे. त्यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

तो त्याच्या चाहत्यांसोबत प्रश्नोत्तराचे सत्र करत होता. यावेळी त्यांनी राम मंदिराचा उल्लेख केला, जो चर्चेचा विषय बनला. जेव्हा एका चाहत्यांने त्याला विचारले की 2024 मध्ये काय होईल, तेव्हा त्यांनी लिहिले - 'तेथे मंदिर बांधले जाणार आहे.'

22 जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय राजकारण आणि मीडियामध्ये राम मंदिर हा चर्चेचा विषय बनला आहे.

तत्पूर्वी, प्रसादने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 2023 वर्ल्ड कप टीम इंडियाशी संबंधित कडू आणि गोड आठवणींबद्दल सांगितले. वर्ल्ड कपदरम्यान भारताने घरच्या भूमीवर इतर संघांवर कसे वर्चस्व गाजवले, परंतु अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आणि ऑस्ट्रेलिया चॅम्पियन झाला. यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये कांगारूंकडून भारताचा पराभव झाल्याबद्दलही प्रसादने खेद व्यक्त केला.

भारताने शेवटची ICC ट्रॉफी जिंकून 10 वर्ष झाले आणि एका चाहत्याने प्रसादला विचारले की भारतीय संघ "जागतिक क्रिकेटचा नवीन चोकर्स" आहे का?

ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या दोन कसोटी मालिका विजयावर प्रकाश टाकत प्रसादने संघाला "चॉकर्स" टॅग देण्यास नकार दिला. तथापि, भारताच्या आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ आणखी एक वर्ष वाढल्याने प्रसाद म्हणाले की, भारतीय क्रिकेटमध्ये काहीतरी चूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT