Pro Kabaddi
Pro Kabaddi Twitter
क्रीडा

Pro Kabaddi : विदर्भाच्या 'पोट्यानं' पदार्पणात घेतला दमदार 'पंगा'

रेवननाथ गाढवे

VIVO Pro Kabaddi News : बंगळुरात रंगलेल्या विवो प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामाच्या तिसऱ्या दिवशीच्या सामन्यात विदर्भ एक्स्प्रेस आकाश पिकलमुंडे (Akash pikalmunde Kabaddi) या भंडारा जिल्ह्यातील तरुणाने बंगाल वॉरियर्स या संघातून दमदार कामगिरी करून दाखवली. पदार्पणाच्या सामन्यात या पोट्यानं (पोरानं) संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

प्रो कबड्डीच्या (PKL 8) आठव्या हंगामाच्या तिसऱ्या दिवशी बंगाल वारियर्स (Bengal Warriors) विरुद्ध गुजरात जॉयंट्स (Gujarat Giants) यांचा तिसऱ्या क्रमांकाचा सामना रंगला होता. यावेळी प्रो कबड्डीत प्रथमच आकाशला अतिरिक्त खेळाडू म्हणून खेळण्याची संधी मिळाली. या संधीचे त्याने सोने करत विरुद्ध खेळाडूंना चांगलेच धुऊन काढले. 4 गडी बाद करत संघाच्या विजयात त्याने मोलाचा वाटा उचलला. प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात बंगाल वॉरियर्स संघाचा हा दुसरा सामना होता. काही कारणास्तव आकाशला पहिल्या सामन्यात खेळता आले नाही. परंतु, दुसऱ्या सामन्यात संधी मिळताच आकाशने संधीचे सोने केलं व संघासाठी उत्तम कामगिरी केली.

●बंगाल वॉरियर्स संघ विजय

जरी बंगाल वॉरियर्स संघ पश्चिम बंगालमधला असला तरी मोहाडी येथील खेळाडू आकाश पिकलमुंडे या संघात असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कबड्डीप्रेमींची नजर या सामन्याकडे होती. सलग दुसऱ्या दिवशी या संघाने ४१ गुण मिळवून विजय आपल्या नावावर केले. या सामन्यात बंगाल वॉरियर्स संघाने रेडमध्ये अठरा तर डिफेन्समध्ये ८ पॉईंट कमावले व सामन्यात विजय संघाच्या नावे केली.

●गिरीश एर्नाकला दोनदा केलं बाद

सुपरहिट रंगलेल्या सामन्यात आकाशने गुजरात जाईंट संघाचा उत्कृष्ट असलेला खेळाडू गिरीश एर्नाक याला दोनदा बाद केले. संपूर्ण सामन्यात आकाशने चार खेळाडूला बाद केले व आपल्या संघाला एक अतिरिक्त पॉईंटही मिळवून दिला. त्याच्या या कामगिरीमुळे कबड्डी सामना पाहणारे प्रेक्षकही अवाक् झाले होते.

●एकाच घरी टीव्हीसमोर २०० प्रेक्षक

आकाशचे मूळ गाव असलेल्या मोहाडी तालुक्यातील विहीरगाव येथे शुक्रवारी रात्री स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर रंगलेला कबड्डीचा सामना पाहण्यासाठी गावातील दीडशे ते दोनशे प्रेक्षक देंगे यांच्या घरी जमले होते. गावात केबल टीव्हीची संख्या कमी असल्यामुळे लोक एकत्रित बसून सामन्याचा आनंद घेत होते. आकाशच्या उत्कृष्ट खेळानंतर संपूर्ण खोलीत टाळ्यांचा कडकडाट होत होता. रविवारी रात्री होणाऱ्या बंगाल वॉरियर्स संघाच्या सामन्याला जिल्ह्यातील प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

Rohit Pawar : विधानसभेआधी माझा अरविंद केजरीवाल करतील; आमदार रोहित पवार यांचा खळबळजनक दावा

CSK च्या मिचेलने एक-दोन नाही, तर पकडले तब्बल 5 कॅच अन् IPL मध्ये रचला मोठा विक्रम

Narendra Modi : ''कर्नाटकमध्ये संविधान बदलण्याचा प्रयत्न, परंतु जोपर्यंत मोदी जिवंत आहे तोपर्यंत..'' पंतप्रधान नेमकं काय म्हणाले?

Salman Khan Firing Case : सलमान खान गोळीबार प्रकरणातील चारही आरोपींना मोक्का कोर्टासमोर केलं हजर

SCROLL FOR NEXT