क्रीडा

Vijay Hazare Trophy:मुंबईचा जलवा ! विजय हजारे ट्रॉफीत मिळवला सलग पाचवा विजय, शार्दुलने केली अष्टपैलू कामगिरी

मुंबईचा लागोपाठ पाचवा विजय, विजय हजारे ट्रॉफीत विजयी घोडदौड सुरुच

सकाळ डिजिटल टीम

Vijay Hazare Trophy 2023: विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड मुंबईने कायम ठेवली. चेतेश्वर पुजारा खेळत असलेल्या सौराष्ट्र संघावर ५ विकेट आणि ९२ चेंडू राखून विजय मिळवला. सलग पाचव्या विजयामुळे मुंबईने बाद फेरी निश्चित केली.

भारतीय संघातील शार्दुल ठाकूर वर्ल्डकपच्या विश्रांतीनंतर आजच्या सामन्यात खेळला आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे मुंबईचा विजय सोपा झाला. शार्दुलने ३७ धावांत २ विकेट आणि नाबाद ३९ धावांची खेळी केली.

मुंबईच्या या विजयात गोलंदाजांची कामगिरी अधिक प्रभावी ठरली. त्यांनी सौराष्ट्रचा डाव ४०.५ षटकांत १४४ धावांत गुंडाळला. त्यानंतर विजयी आव्हान ३४.४ षटकांत पूर्ण केले, परंतु मुंबईने निम्मा संघ ७६ धावांत गमावला होता. त्यावेळी बाद झालेल्या फलंदाजांमध्ये कर्णधार अजिंक्य रहाणेचा समावेश होता.

थोडेसे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असताना यष्टीरक्षक फलंदाज प्रसाद पवार आणि शार्दुल ठाकूर यांनी नाबाद ७४ धावांची भागीदारी करून मुंबईचा विजय सोपा केला. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला १२ धावाच करता आल्या, परंतु त्याच्यासह आता भारतीय संघातून दूर असलेल्या चेतेश्वर पुजाराने नाबाद ५५ धावा करून सौराष्ट्रचा डाव सावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. (Latest Marathi news)

सौराष्टाची ८ बाद ११४ अशी घसरगुंडी उडाली होती. एक बाजू पुजारा लढवत असताना धर्मेंद्रसिंग जडेजा आणि जयदेव उनाडकट या तळाच्या फलंदाजांनी प्रत्येकी १० धावांचे योगदान दिले. त्यामुळे त्यांना १४४ धावांपर्यंत मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलक ः सौराष्ट्र ः ४०.५ षटकांत सर्वबाद १४४ (हार्विक देसाई २७, चेतेश्वर पुजारा नाबाद ५५ -११४ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, अप्रित वसवादा १६, तुषार देशपांडे ७.५-०-२७-१, मोहित अवस्थी ७-०-३२-१, शार्दुल ठाकूर ८-२-३७-२, शम्स मुलानी १०-३-१६-२) पराभूत वि. मुंबई ः ३४.४ षटकांत ५ बाद १५० (अंगक्रिश रघुवंशी ८, जय बिस्ता ४, सुवेद पारकर १७, अजिंक्य रहाणे १२, सर्फराझ खान १७, प्रसाद पवार नाबाद ४३ - ६३ चेंडू, ४ चौकार, १ षटकार, शार्दुल ठाकूर नाबाद ३९ - ४४ चेंडू, २ चौकार, २ षटकार, जयदेव उनाडकट ९-१-३५-२, चिराग जानी ७-०-०३३-१) (Latest Marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT