Vinesh Phogat Latest News Update sakal
क्रीडा

Vinesh Phogat : दुखापतीच कारण सांगून माघार घेतली असती तर विनेश फोगाट जिंकली असती सिल्वर मेडल? जाणून घ्या नियम

Vinesh Phogat Latest News Update : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट 100 ग्रॅम जास्त वजनामुळे ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरली.

Kiran Mahanavar

Vinesh Phogat Disqualification : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी तीन सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट 100 ग्रॅम जास्त वजनामुळे ऑलिम्पिकसाठी अपात्र ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत पॅरिसमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय संघाशी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले, मात्र विनेशला पदक मिळवता आले नाही.

आपले वजन ५० किलोच्या आत येत नाही, याची जाणीव झाल्यावर विनेश दुखापतीचे कारण सांगून अंतिम फेरीतून माघार घेऊ शकली असती त्यामुळे तिला किमान रौप्यपदक तरी मिळाले असते, असा प्रश्न अनेक जण उपस्थित करत आहे. मात्र, नियमानुसार विनेशला हे करता येत नाही.

जागतिक कुस्ती महासंघाचा नियम काय सांगतो..

- एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आणि पुढे खेळू शकणार नसेल तर त्याला पुन्हा वजन करण्याची गरज नाही. दुखापतीपूर्वी त्याने मिळवलेले गुण कायम राहतात; पण जर त्या मल्लाला पुढच्या सामन्यात खेळायचे असेल तर जागतिक कुस्ती महासंघाच्या डॉक्टरांकडून तिला किंवा त्यांना तंदुरुस्तीचे प्रमाणपत्र मिळवावे लागते.

- जर पहिल्याच दिवशी दुखापत किंवा आजार झाला तर पुढच्या फेरीत खेळण्यापूर्वी त्या मल्लाला वजन काट्यावर उभे राहावेच लागते. तसे केले नाही तर तो मल्ल अपात्र ठरतो.

- वजनाच्या वेळी केवळ एक युनिफॉर्म परिधान करायला परवानगी असते.

- व्यवस्थित कपडे परिधान केले नसतील तर रेफ्री खेळाडूला वजन करण्यास परवानगी देत नाही.

- पदकाची लढत असेल तर थोड्या ग्रॅम वजनालाही परवानगी नसते.

- अंतिम सामन्याच्या वेळी दोनदा वजन चाचणी होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Riteish Deshmukh ने शेअर केला वडीलांचा व्हिडिओ, शिवजयींतीवर काय म्हणाले होते विलासराव देशमुख?

Winter Olympics 2026 : स्पर्धा नेमकी कशाची? स्पर्धेला सुरुवात होताच तीन दिवसात १० हजार कंडोमचा वापर

Latest Marathi News Live Update : एसीबी ट्रॅपचा धक्का, मंत्री नरहरी झिरवळ ‘नॉट रिचेबल’; पीएवर पैसे मागितल्याचा आरोप

Mumbai News : पलाश-स्मृती मानधना वाद उच्च न्यायालयात 

Farmer Debt Relief Scheme : कर्जमाफीसाठी सरकारची तयारी; अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा, ३० जूनपूर्वी घोषणा शक्य

SCROLL FOR NEXT