Vinesh Phogat  esakal
क्रीडा

Vinesh Phogat : ...बस उपर वाले को सब खबर हैं! WFI च्या पदाधिकाऱ्यांच्या निलंबनानंतर विनेश फोगाटची प्रतिक्रिया

विनेश फोगाटने लढाई अजून संपली नसल्याचे संकेत दिले.

अनिरुद्ध संकपाळ

Vinesh Phogat : क्रीडा मंत्रालयाने ब्रिजभूषण समर्थक संजय सिंह यांना आज जोरदार झटका दिला. क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती परिषदेच्या नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी निलंबीत केलं आहे. क्रीडा मंत्रालयाने निवडणूक घेताना खूप घाई गडबड करण्यात आली आणि योग्य पद्धत अवलंबवण्यात न आल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले.

यानंतर ब्रिजभूषण शरण सिंहविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपली प्रतिक्रिया दिली. विनेश फोगाटने साहिर लुधयानवी यांचा एक शेर पोस्ट केला. 'बस इस बात का सबर हैं! उपर वाले को सब खबर हैं!' हा शेर पोस्ट करत विनेशने आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

याचबरोबर आज तकशी बोलताना विनेश म्हणाली की, 'जर आम्ही हार मानली असती तर जगभरातील महिला मग त्या कुस्तीमधील असतील किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील असतील त्यांना आपला आवाज उठवणं अवघड झालं असतं. भारतीय कुस्ती परिषदेत असे लोक हवेत जे कुस्तीसाठी विशेषकरून महिलांसाठी चांगल काम करू शकतील. आम्ही हे पहिल्या दिवसापासूनच सांगतोय.'

'आम्ही जे सहन केलं ते इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये. ही आमची लढाई होती. ज्यांनी गैरकृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांना निलंबीत करताना सांगितले की, '15 आणि 20 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेची घोषणा ही घाई गडबडीत घेण्यात आली. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या कुस्तीपटूंना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय गेण्यात आला. यावेळी भारतीय कुस्ती परिषदेच्या घटनंतील तरतुदींचे पालन करण्यात आलेले नाही.'

ज्यावेळी संजय सिंह हे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यानंतर भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष झाले त्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने आपण कुस्ती सोडत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. साक्षीसोबतच विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी देखील आंदोलन केले होते. बजरंगने तर आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांकडे परत केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT