Vinesh PHOGAT won gold medal in 53 kg Wrestling In Commonwealth Games 2022  esakal
क्रीडा

CWG 2022 : विनेश फोगटची सुवर्ण हॅट्ट्रिक; कुस्तीच सुवर्ण पंजा

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटने (Vinesh Phogat) श्रीलंकेच्या चमोदियाचा 4 - 0 असे पराभूत करत सुवर्ण पदक पटकावले. विनेशने या सुवर्ण पदकासह राष्ट्रकुल स्पर्धेतील आपले सलग तिसरे सुवर्ण पदक (Gold Medal) पटकावले. तिने 2014 च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले होते. त्यानंतर 2018 च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत विनेशने 50 किलो वजनी गटात सुवर्ण पदकाची कमाई केली होती. विनेशच्या या पदकाबरोबरच भारताने बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीतील पाच सुवर्णासह 9 पदके पटकावली आहे.

भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने पुरूष 57 किलो वजनी फ्रीस्टाईल गटात सुवर्ण पदक पटकावले. त्याने नायजेरियाच्या एबिकेनेनिमो वेल्सनचा 10 - 0 असा पराभव केला. रवी कुमार दहियाची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा होती त्याने पहिल्याच स्पर्धेत फायनल पर्यंत धडक मारली होती.

भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलँडच्या ख्रिस्टलेचा 12 - 2 असा पराभव करत महिला 50 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्य पदक पटकावले. कुस्तीमधून भारताला मिळालेले हे दुसरे कांस्य पदक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT