Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : बर्थडे बॉय विराटच्या बॅटमधून आले 49 वे शतक; आव्हानात्मक खेळपट्टीवर सचिनच्या विक्रमाशी केली बरोबरी

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli : विराट कोहलीने अखेर आपले 49 वे वनडे शतक पूर्ण केलेच! वाढदिसालाच विराट कोहलीच्या बॅटमधून आलेले हे विक्रमी शतक खास ठरले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात 119 चेंडूत शतक ठोकले. त्याने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 49 शतके ठोकण्याच्या विक्रमाशी विराट कोहलीने बरोबरी केली.

त्याने इडन गार्डनवरच्या संथ आणि फिरकीला साथ देणाऱ्या आव्हानात्मक खेळपट्टीवर झुंजार शतकी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 300 प्लसची धावसंख्या उभारली.

विराट कोहलीने 49 वे शतक पूर्ण केले. विराट कोहलीचे हे 79 वे आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. विराट कोहली हा वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 49 शतक पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने 277 डावात ही किमया केली तर सचिन तेंडुलकरने 451 डावात 49 वनडे शतके केली होती.

विराट कोहलीने सचिनच्या 49 व्या वनडे शतकांच्या विक्रमाशी यापूर्वीच बरोबरी केली असती मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 94 चेंडूत 88 धावा करून बाद झाला. तर न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात त्याचे अर्धशतक अवघ्या 5 धावांनी हुकले. तो 104 चेंडूत 95 धावा करून बाद झाला. तो षटकार मारण्याच्या नादात बाद झाला होता.

भारताकडून विराट सोबतच श्रेयस अय्यरने 77 धावांचे योगदान दिले. या दोघांच्या तिसऱ्या विकेटसाठीच्या 134 धावांच्या शतकी भागीदारीमुळेच भारत दक्षिण आफ्रिकेसमोर 326 धावा करू शकला. रोहित शर्माने देखील सुरूवातीला आक्रमक फलंदाजी करत 40 धावा केल्या. तर स्लॉग ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 29 धावा चोपल्या. सूर्यकुमार यादवने 22 तर शुभमन गिलने 23 धावांचे योगदान दिले.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

भारतीय क्रीडा विश्वावर शोककळा! ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे निधन

Latest Marathi News Live Update : जालन्यात ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात आधार, पॅन आणि मतदान कार्ड कचऱ्यात

Nitin Gadkari: गरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी; पश्चिम, उत्तर नागपूरमधील मतदारांशी साधला संवाद!

SCROLL FOR NEXT