Virat Kohli sakal
क्रीडा

Virat Kohli :रूममध्ये घुसखोरी झाल्यामुळे कोहली भडकला; ऑस्ट्रेलियात टीम इंडियाच्या सुरक्षेचा बोजवारा

ऑस्ट्रेलिया मधून सर्वात मोठी बातमी! टीम इंडिया हॉटेलमध्ये नाही सुरक्षित

Kiran Mahanavar

Virat Kohli : ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडिया सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण ऑस्ट्रेलियात हॉटेलमध्ये भारतीय खेळाडू सुरक्षित नाहीत. मोठी बातमी म्हणजे एका अनोळखी चाहत्याने पर्थमध्ये विराट कोहलीच्या खोलीत घुसून त्याच्या खोलीचा व्हिडिओ बनवला आहे. विराट कोहलीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भयानक म्हटले आहे. मोठी गोष्ट म्हणजे ही घटना घडली तेव्हा विराट कोहली तिथे उपस्थित नव्हता.

या घटनेनंतर विराट कोहली खूपच विचलित झाला आहे. विराट कोहलीने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, मला समजले आहे की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदित आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि मी नेहमीच त्याचे कौतुक केले आहे. जर मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर मी कुठे अपेक्षा करू शकतो? मी या प्रकारची कृती आणि माझ्या गोपनीयतेचे उल्लंघन याशी सहमत नाही. मला ते मान्य नाही. कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना मनोरंजनाची वस्तू मानू नका.

वास्तविक भारतीय क्रिकेट संघ पर्थमध्ये असून हा व्हिडिओ पर्थमधील हॉटेलमधील असल्याचे मानले जात आहे. ICC टी-20 विश्वचषक 2022 चा गट-2 सामना 30 ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला.ज्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT