Virat Kohli Also Keep Karva Chauth Vrat For Anushka Sharma esakal
क्रीडा

Karva Chauth Vrat : नुसते यशाचे श्रेय नाही; विराट अनुष्कासाठी करतो 'करवा चौथ'चेही व्रत

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Anushka Sharma And Karva Chauth Vrat : भारताची रन मशिन विराट कोहली पुन्हा एकदा आपल्या जुन्या लयीत परतली आहे. विराट कोहलीच्या बॅटमधून आता धावांचा पाऊस पडत असून त्याचा बॅड पॅच संपला आहे. मध्यंतरी विराट कोहलीने आपल्याला या बॅडपॅचमधून बाहेर येण्यासाठी अनुष्का शर्माने पाठबळ दिलं असे सांगितले होते. विराट कोहलीने आपले 71 वे आंतरराष्ट्रीय शकत पत्नी अनुष्का शर्मा आणि वामिकला समर्पित केले होते. विराट कोहली आपल्या यशाचे श्रेय कायम अनुष्काला देत असतो. विशेष म्हणजे प्रथेनुसार पत्नी आपल्या पतीसाठी करवा चौथचे व्रत पाळत असते. मात्र विराट कोहली आपल्या पत्नीसाठी अनुष्कासाठी करवा चौथचे व्रत ठेवतो.

विराट कोहलीने याबाबतचा खुलासा 2019 मध्ये केला होता. विराट कोहलीने मध्यरात्री एक फोटो शेअर करत सांगितले होते की त्याने अनुष्कासोबत करवा चौथचे व्रत पाळले आहे. अनुष्काने देखील फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. हा फोटो पाहून विराट आणि अनुष्काचे फॅन्सनी दोघांचे कौतुक केले होते. आज भारतातील अनेक प्रांतमध्ये करवा चौथचे व्रत पाळण्यात येते. या अनुशंगाने विराट आणि अनुष्काच्या या आदर्शवत स्टोरीला पुन्हा उजाळा मिळाला.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारताचा पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत 23 ऑक्टोबरला होणार आहे. या सामन्यानेच भारत आपली वर्ल्डकपची मोहिम सुरू करणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता. मात्र भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहचण्यात अपयशी ठरला होता. भारताने 2013 मध्ये शेवटची आयसीसी ट्रॉफी जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT