Virat Kohli and Babar Azam fans slogan war during PSL in Stadium
Virat Kohli and Babar Azam fans slogan war during PSL in Stadium  esakal
क्रीडा

VIDEO: पाकिस्तानातील स्टेडियम 'कोहली' नावाने दुमदुमले; बाबर चाहते भडकले

अनिरुद्ध संकपाळ

इस्लामाबाद: पाकिस्तानात सध्या पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सुरू आहे. मात्र या स्पर्धेत पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमचा (Babar Azam) कराची किंग्ज संघ 10 सामन्यात फक्त 2 विजय मिळवून गुणतालिकेत तळात आहे. तर धडाकेबाज सलामीवीर मोहम्मद रिझवानचा मुल्तान सुल्तान संघ 18 गुणांसह टॉपवर आहे. कराची किंग्जचा कर्णधार बाबर आझम यंदाच्या पीएसएल स्पर्धेत चांगली फलंदाजी करत आहे मात्र त्याला इतर संघाकडून सहाय्य मिळत नाहीये. (Virat Kohli and Babar Azam fans slogan war during PSL in Stadium)

दरम्यान, सततच्या पराभवाने वैतागलेल्या बाबार आझमच्या चाहत्यांना पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL) भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावाच्या घोषणा देखील ऐकाव्या लागत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. त्यात विराट कोहलीचे काही पाकिस्तानी चाहते स्टेडियममध्ये विराट कोहलीचे पोस्टर (Virat Kohli Poster In Pakistan Stadium) घेऊन मैदानात अल्याचे दिसले. दुसऱ्या बाजूला बाबर आझमचे चाहते मैदानात त्याच्या नावाच्या घोषणा (Slogan) देत असताना दिसले. या व्हिडिओत विराट आणि बाबर आझमच्या चाहते आपल्या आवड्या खेळाडूच्या नावाची घोषणाबाजी करताना दिसतात.

जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि बाबर आझम हे दोन दर्जेदार फलंदाज म्हणून ओळखले जातात. विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (Cricket) मोठमोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. तो सचिन तेंडुलकरचा शतकांच्या शतकाचा विक्रम मोडण्याच्या जवळ पोहचत आहे. तर बाबर आझम देखील एक एक विक्रम पादाक्रांत करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT