VIDEO: RCBने प्लॅनिंग करून CSKचा 'सिंह' फोडला; त्याचीच होईल ताजपोशी?

RCB planning for Faf du Plessis before IPL 2022 Auction may make him captain
RCB planning for Faf du Plessis before IPL 2022 Auction may make him captain esakal

नवी दिल्ली : आयपीएलची (Indian Premier League) लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व संघांनी आपला सर्वोत्तम संघ निवडण्याचा प्रयत्न केला. काही संघांनी खेळाडूंबरोबर आपला संभाव्य कर्णधार देखील विकत घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवले. रॉयल चॅलेंजर बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात देखील विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर कर्णधाराची जागा रिकामी आहे. दरम्यान, संघाचे कोचिंग डायरेक्टर माईक हसन (Mike Hassan) यांनी आपल्या नवा कर्णधार कोण असले याची हिंट दिली.

RCB planning for Faf du Plessis before IPL 2022 Auction may make him captain
साहा धमकी प्रकरणात शास्त्रींची उडी; BCCI ने घेतली ही भूमिका

आरसीबीने (RCB) आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कोचिंग डायरेक्टर माईक हसन यांनी फाफ ड्युप्लेसिसला (Faf du Plessis) आरसीबीच्या गोटात खेचण्यासाठी लिलावापूर्वी बरीच मोठी प्लॅनिंग झाली असल्याचे सांगितले. आरसीबीने शेअर केलेल्या या व्हिडिओत हसन म्हणतात की दक्षिण आफ्रिकेच्या या माजी कर्णधाराकडे संघाचे नेतृत्व करण्याचा देखील अनुभव आहे. आपण त्याला लिलावात खरेदी करायला हेवे. त्याला खरेदी करण्यासाठी आपल्याला आपला पैसा राखून ठेवणे गरजेचे आहे. सीएसके (CSK) त्याला परत घेण्यासाठी जोर लावेल त्यामुळे आपण तयार रहायला हवे. माईक फाफ ड्युप्लेसिस बरोबरच श्रीलंकेच्या वानिंदु हसरंगाला देखील खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम राखून ठेवण्यास सांगताना या व्हिडिओत दिसतात.

RCB planning for Faf du Plessis before IPL 2022 Auction may make him captain
परागनंदाची काळी प्यादी जोमात; जगज्जेता कार्लसेन कोमात!

आरसीबीने फाफ ड्युप्लेसिसला 7 कोटी रूपयांना खरेदी केले तर वानिंदू हसरंगाला (Wanindu Hasaranga) 10.75 कोटीची बोली लावून आपल्या गोटात खेचले. फाफ ड्युप्लेसिसने चेन्नई सपर किंग्जला (Chennai Super Kings) गेल्या हंगामात विजेतेपद जिंकून देण्यात मोठी भुमिका बजावली होती. त्याने 16 सामन्यात 45.21 च्या सरासरीने 633 धावा केल्या होत्या. यात 6 अर्धशतकी खेळींचा समावेश होता. आरसीबीच्या कोचिंग डायरेक्टर माईस हसन यांच्या वक्तव्यावरून आरसीबी संघाच्या नेतृत्वाची माळ फाफ ड्युप्लेसिसच्या गळ्यात घालण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com