Virat Kohli Shubman Gill esakal
क्रीडा

Virat Kohli Shubman Gill : ब्रोमान्स असावा तर असा... विराट अन् शुभमननं मैदानावरच घातली फुगडी

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Shubman Gill : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीत पहिल्या चेंडूपासूनच काही ना काही हॅपनिंग होत आहे. भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत आफ्रिकेला 55 धावात गारद केलं. त्यानंतर विराट कोहलीने पहिल्या डावात झुंजार 46 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघ 150 चा टप्पा पार करू शकला अन् महत्वाची 98 धावांची आघाडी घेऊ शकला.

दरम्यान, फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर विराट कोहली क्षेत्ररक्षण करताना देखील फार अॅक्टिव्ह होता. कसोटी असो वा वनडे विराट कोहली कायम मैदानावर काही नाही काही करत असतो. त्याने दुसऱ्या कसोटीत देखील खूप मस्ती केली. केशव महाराज आल्यानंतर त्याने धनुष्यबाण पोज दिली अन् नमस्कार देखील केला. त्यानंतर त्याने शुभमन गिल सोबत देखील मस्ती केली. त्याचा आन् गिलचा मैदानावरील ब्रोमान्स सर्वांनाच माहिती आहे. या दोघांनी फुगडी घातल प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2024 मधील दुसरी कसोटी विकेट्स पडल्यामुळे दीर्घकाळ स्मरणात राहील. न्यूलँड्स येथे खेळल्या गेलेल्या या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी एकूण 23 विकेट पडल्या. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारताने मोहम्मद सिराजच्या (6/15) कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीसह यजमान संघाला एकूण 55 धावांत रोखले. भारताविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वात कमी कसोटी धावसंख्या आहे.

त्यानंतर भारताने पहिल्या डावात 153 धावा करत 98 धावांची आघाडी घेतली. भारत एकेकाळी 4 बाद 153 धावांवर होता. त्यानंतर तब्बल 6 विकेट्स शुन्य धावात पडल्या होत्या. दरम्यान, आफ्रिकेने दुसऱ्या डावात थोडी झुंज दिली.

एडिन मार्करमने 106 धावांची झुंंजार शतकी खेळी केली. त्या खेळीच्या जोरावर आफ्रिकेने दुसऱ्या डावात 176 धावांपर्यंत मजल मारली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्ह संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी

Atiq Ahmed Son Accident Video: अतिक अहमदच्या मुलाचा अपघात कसा झाला? कार डिव्हायडरला धडकली अन् हवेत उडाली, Live Video Viral

Scam 2010 Marathi Actor: SCAM 2010 मध्ये झळकणार मराठमोळा चेहरा; तुम्ही ओळखलंत का या अभिनेत्याला? पत्नी गाजवतेय मराठी मालिका

YCMOU Exam: धक्कादायक! एकाच विद्यार्थ्याने एकाच वेळी दिल्या दोन परीक्षा, 'मुक्त'च्या परीक्षेत ४० जणांचा प्रताप; विद्यापीठाकडून दखल

Ethanol Production Restrictions: उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध?; साखरेचे भाव नियंत्रणासाठी उत्पादन वाढविणार

SCROLL FOR NEXT