Virat-Kohli 
क्रीडा

Breaking: विराटने सोडलं कर्णधारपद; ट्विटरवरून केली घोषणा

Breaking: T20 World Cup नंतर विराट सोडणार 'टीम इंडिया'चे कर्णधारपद! विराटनंतर कर्णधारपदासाठी रोहितचं नाव चर्चेत Virat Kohli announces on Twitter that he is stepping down as the team's T20 Captain after T20 World Cup in Dubai vjb 91

विराज भागवत

Virat Kohli Stepping Down as T20 Captain: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने एक मोठी घोषणा केली. तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या विराटने टी२० विश्वचषक स्पर्धा २०२१नंतर भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून, विराट कर्णधारपद सोडणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. विराटला टी२० मध्ये फलंदाजीकडे लक्ष केंद्रीत करायचे असल्याने तो कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त होणार असल्याची चर्चा होती. अखेर त्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला.

विराटने ट्वीटरवर पोस्ट पत्रात लिहिले आहे की...

मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. कारण मला भारतीय संघात खेळायची तर संधी मिळालीच पण त्यासोबतच संघाचे नेतृत्वदेखील करण्याची संधी मिळाली. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून प्रवास सुरू असताना ज्यांना मला पाठिंबा दर्शवला त्या साऱ्यांचा मी आभारी आहे. माझे पाठीराखे, फॅन्स, संघातील सहकारी, सपोर्ट स्टाफ, निवड समिती, प्रशिक्षक आणि इतर सर्व जणांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या साऱ्यांच्या पाठिंब्यानेच मी यशस्वी होऊ शकलो.

आपल्यावर पडणारा कामाचा ताण आणि शारिरीक ताण ओळखणे ही महत्त्वाची गोष्ट असते. गेल्या ८-९ वर्षात मी खूप क्रिकेट खेळलो आहे. गेले ५-६ वर्षांपासून मी तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधाराची भूमिका बजावतो आहे. पण आता मला स्वत: थोडा वेळ देणं गरजेचं आहे. त्यासोबतच संघाला कसोटी आणि वन डे कर्णधार म्हणून आणखी पुढे घेऊ जाण्यावर मला लक्ष केंद्रीत करायचं आहे. आतापर्यंत मी टी२० संघाला कर्णधार म्हणून सर्वस्व अर्पण केलं आहे. यापुढेही मी संघात एक फलंदाज म्हणून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेण्यासाठी मी खूप वेळ विचार केला. संघ व्यवस्थापन, रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी दीर्घ काळ चर्चा केल्यानंतर अखेर मी टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. BCCI चे सचिव जय शाह, अध्यक्ष सौरव गांगुली आणि निवड समिती यांच्याशी याबद्दल मी आधीच बोललो होतो. त्यांनी मला या निर्णयात पाठिंबा दिला. कर्णधारपद सोडलं असलं तरी संघातील खेळाडू म्हणून मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्यास नेहमीच प्रयत्नशील असेन.

विराटच्या जागी रोहित शर्माच्या नावाची चर्चा

भारतीय संघाचा सध्याचा उपकर्णधार रोहित शर्मा याला विराटनंतर संघाचे नेतृत्व करण्याची संधी देण्यात येण्याची शक्यता आहे. रोहितने अनेकदा विराटच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच, मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करताना रोहितने तब्बल पाच वेळा संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे सध्या तरी विराटनंतर कर्णधारपद रोहितकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT