Virat Kohli Bad Form Continue twitter user file Vintage Kohli missing Report
Virat Kohli Bad Form Continue twitter user file Vintage Kohli missing Report esakal
क्रीडा

Virat Kohli: 'विराट मिसिंग' रिपोर्ट कोणी केला फाईल?

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेत भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा एकदा फेल गेला आहे. पहिल्या दोन सामन्यात विराट कोहली अनुक्रमे 8 आणि 18 धावा करून बाद झाला होता. आता तिसऱ्या सामन्यात तर त्याने कहरच केला. अवघ्या 2 धावात तो भोपळाही न फोडता माघारी परतला. विराटच्या सध्याच्या फॉर्मवरून (Virat Kohli Bad Form) त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. सोशल मीडियावर तो शुन्यावर बाद झाल्यानंतर तुफान मीम्स व्हायरल होत आहे. (Virat Kohli Bad Form Continue twitter user file Vintage Kohli missing Report)

ट्विटवर #Kohli हा ट्रेंड सुरू आहे. अनेक चाहत्यांनी विराटच्या खराब फॉर्मवरून त्याच्यावर भन्नाट मीम्स तयार केले आहेत. एका ट्विटर युजरने तर विराट कोहली बेपत्ता झाला असल्याचा रिपोर्टच फाईल केला. त्याने मिसिंग रिपोर्ट, नाव जुना विराट कोहली (Vintage Virat Kohli) , वय 33 शेवटचे पाहण्यात आले 23 November 2019 असे लिहीत विराट कोहलीच्या शतकाचा फोटो शेअर केला. आहे.

दुसऱ्या एका युजरने तर विराट कोहलीला आता विश्रांती देण्याची गरज असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, मला वाटते की विराट कोहलीला विश्रांती देण्यात यावी आणि बेंचवरच्या नव्या लोकांना संधी द्यायला हवी.'

भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली या दोघांनी स्वस्तात गमावले. मात्र त्यानंतर ऋषभ पंत (Rishabh Pant) आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) भारताचा डाव सावरत 150 च्या पार पोहचवले. दोघांनी आपली अर्धशतके पूर्ण केली. मात्र 56 धावांवर पंतने अय्यरची साथ सोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT