Virat Kohli  esakal
क्रीडा

Virat Kohli : जगात भारी विराट कोहली! वनडेत शतकांची पन्नाशी पार, सचिनचा विश्वविक्रम 23 वर्षानंतर मोडला

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli Broke Sachin Tendulkar Records : विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील आपले 50 वे शतक ठोकले. त्याने ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमवर अजून एक मोठा इतिहास रचला. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये 50 शतके ठोकणारा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचे वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विश्वविक्रम 23 वर्षानंतर मोडला. सचिनने 2012 मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरूद्ध आपले 49 वे वनडे शतक ठोकले होते.

विराट कोहलीने 279 डावत 50 वनडे शतके ठोकली आहेत तर सचिन तेंडुलकरने 452 डावात 49 शतके ठोकण्याची कामगिरी केली होती. वनडे क्रिकेटमध्ये आता सर्वाधिक शतके ठोकणाऱ्यांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकावर तीन भारतीयच आहेत. तिसऱ्या स्थानावर 31 शतकांसह रोहित शर्मा विराजमान आहे. तर चौथ्या स्थानावर रिकी पाँटिंग आङे.

वनडेत सर्वाधिक शतके :
50 - विराट कोहली
49 - सचिन तेंडुलकर
31 - रोहित शर्मा
30 - रिकी पाँटिंग
28 - सनथ जयसुर्या

विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे मधील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्यापूर्वी अजून एक विक्रम मागे टाकला होता. त्याने एका वनडे वर्ल्डकप एडिशनमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम देखील मोडला. सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत 711 धावा केल्या आहेत. वनडे वर्ल्डकपच्या एका एडिशनमध्ये 700 धावा करणारा देखील विराट कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील एका एडिशनमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

अक्कलकोटच्या सीमावर्ती गावांमध्ये हातभट्टीचा महापूर! ‘एक केटी दे’ म्हटले की मिळते हातभट्टी, विषारी ताडी; पोलिसांच्या आऊट पोस्टजवळच विषारी ताडी विक्री

Milk Rate Increase : शेतकऱ्यांना दिलासा! पुणे जिल्हा दूध संघाकडून गाय दूध खरेदी दरात एक रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT