Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : विराटने डिकॉक अन् रचिनला टाकलं मागं; भारतात भारतीय खेळाडूचीच दादागिरी

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यात आज वानखेडेवर रोहित शर्मा आणि शुभमन गिल या सलामी जोडीने धुमाकूळ घातला. मात्र शांत मात्र तितकीच महत्वाची खेळी करणाऱ्या विराट कोहलीने देखील भारतीयांसाठी गौरवशाली कामगिरी केली.

विराट कोहली यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 600 धावांचा टप्पा पार केला असून तो एका वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सध्या पाचव्या स्थानावर पोहचला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यात रोहित शर्मा आणि शुभमन गिलने आक्रमक सुरूवात करून देत 71 धावांची सलामी दिली. रोहित बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहलीने डाव पुढे नेला. आक्रमक गिलला विराट कोहलीने सावध फलंदाजी करत चांगली साथ दिली.

या दोघांनी भारताला 20 षटकात 150 पार पोहचवले. मात्र गिल दुखापतीमुळे बाहेर गेल्यावर विराट कोहलीने धावगती वाढवण्यास सुरूवात केली. त्याने 59 चेंडूत अर्धशतक ठोकले. याचबरोबर त्याने श्रेयसच्या साथीने संघाला 28 व्या षटकात द्विशतकी मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT