Virat Kohli 
क्रीडा

Virat Kohli : बादशाहत कायम! T20 मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू

विराट कोहलीने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला खेळाडू ठरला

सकाळ ऑनलाईन टीम

Virat Kohli : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा उपांत्य सामना आज अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. अॅडलेड ओव्हल विराट कोहलीचे आवडते मैदान आहे. विराट कोहलीने पुन्हा इतिहास रचला आहे. कोहलीने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीला हा विक्रम करण्यासाठी फक्त 42 धावांची गरज होती. पण त्याने इंग्लंडविरुद्ध ताबडतोड अंदाजमध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपल्या 4000 धावा पूर्ण केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करणारा कोहली पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

या उपांत्यपूर्व फेरीपूर्वी कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 114 सामन्यांमध्ये 52.77 च्या सरासरीने 3958 धावा केल्या होत्या. यादरम्यान कोहलीने एक शतक आणि 36 अर्धशतके झळकावली. मात्र उपांत्य फेरीत 42 धावा करताच कोहलीने 4000 धावा पूर्ण केल्या आहेत.

कोहली याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये तीन हजार धावा करणारा पहिला क्रिकेटर बनला होता. गेल्या वर्षी त्याने ही कामगिरी केली होती. कोहलीने 87 सामन्यांच्या 81 डावांमध्ये 50.86 च्या सरासरीने 3 हजार धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

मला वाईट वाटतं, मी का बोलले नाही.. प्रथा म्हणून डोहाळे जेवणात घडलेली ती गोष्ट; मृणाल कुलकर्णी आजही विसरलेल्या नाही

Tablet For Students: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार टॅबलेट! मुख्यमंत्र्यांचा निर्णय, DBTद्वारे थेट खात्यात रक्कम

Marathi News Live Updates : हिंगोलीत पंधरा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

Vidarbha Rain Forecast : विदर्भात पावसाचा जोर वाढणार ; चक्रीवादळाचा प्रभाव, २४ सप्टेंबरनंतर मुसळधारेची शक्यता

SCROLL FOR NEXT