क्रीडा

IND vs ENG: "हा असा कॅप्टन"; विराटची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

विराज भागवत

कर्णधार कोहलीच्या वाईट खेळीनंतर भन्नाट मीम्स सोशल मिडियावर व्हायरल

Ind vs Eng 3rd Test: इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या सत्रात भारतीय फलंदाजांची पळता भुई थोडी केली. दुसऱ्या कसोटीत अँडरसन-बुमराह (Anderson Bumrah Fight) वादात बुमराह वरचढ ठरला होता, पण तिसऱ्या कसोटीत अँडरसनने पहिल्याच सत्रात भारताला तीन दणके दिले. लोकेश राहुल (KL Rahul), चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या दोघांना त्याने शून्य आणि एका धावेवर माघारी पाठवले. त्यानंतर कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) शांत व संयमी खेळी करत होता. पण अँडरसनच्या स्विंग गोलंदाजीमुळे तो देखील गांगरला आणि स्वस्तात बाद झाला. १७ चेंडूत ७ धावा काढून विराटला माघारी परतावले लागले. गेल्या अनेक सामन्यांपासून त्याला चांगली कामगिरी करता येत नसल्याने नेटकऱ्यांनी त्याला भन्नाट मीम्स शेअर करत ट्रोल केलं.

विराट बाद झाला तो व्हिडीओ-

स्टंपच्या अतिशय जवळून जाणारा चेंडू खेळण्याशिवाय विराटकडे पर्याय नव्हता. विराटने स्विंग झालेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पण आऊटस्विंग होणारा चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट विकेटकिपर जॉस बटलरकडे गेला. त्यामुळे विराट बाद झाला. त्यानंतर विराटवर टीकेचा भडीमार तर झालाच पण त्या प्रचंड ट्रोलही करण्यात आले.

दरम्यान, गोलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर टॉस जिंकून विराटने फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी करणारा लोकेश राहुल या सामन्यात पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. पाठोपाठ अनुभवी चेतेश्वर पुजारानेही निराशा केली. त्यालाही एका धावेवर माघारी परतावे लागले. त्यानंतर रोहितला साथ द्यायला आलेल्या विराटकडून खूप अपेक्षा होती, पण तो १७ चेंडूत ७ धावा काढत बाद झाला. मुंबईकर अजिंक्य रहाणेला चांगली सुरूवात मिळाली होती, पण 'बर्थ डे बॉय' ओली रॉबिन्सनने त्याला १८ धावांवर माघारी पाठवले. रहाणे बाद झाल्यावर पहिल्या सत्राचा खेळ थांबवण्यात आला. रोहितने मात्र ७५ चेंडूत नाबाद १५ धावा काढत सत्र संपेपर्यंत झुंज दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT