Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli: विराटनं सिक्स मारले याचे दु:ख नाही, पण पांड्यानं... पाकिस्तानी बॉलर हारिस रऊस बोलून गेला

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची चर्चा ही कधीही जुनी होत नाही. ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसते.

सकाळ डिजिटल टीम

Virat Kohli classic style dinesh karthik hardik pandya: भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचची चर्चा ही कधीही जुनी होत नाही. ती नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे होताना दिसते. सोशल मीडियावर तर भारत पाकिस्तान मॅचचा विषय छेडायचा अवकाश की त्यावर हजारो जण प्रतिक्रिया देण्यासाठी तुटून पडतात. सध्या पाकिस्तानी गोलंदाज हारिस रऊफ याची एक प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

वर्ल्ड कपमध्ये २३ ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला होता. त्यात विराटनं केलेल्या चमकदार कामगिरीमुळे भारताला विजय मिळाला. विराटची आतापर्यतची सर्वाधिक प्रभावी खेळी म्हणून त्याकडे पाहिले गेले. आतापर्यत पाकिस्तानच्या अनेक आजी माजी गोलंदाज, फलंदाजांनी विराटचे कौतूक केले आहे. मात्र त्यात वेगवान गोलंदाज हारिस रऊफची प्रतिक्रिया भारतीय क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

रऊफ म्हणाला, भारताला शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ३१ धावा हव्या होत्या. माझ्या चार बॉलवर फक्त तीन धावा भारतीय फलंदाजांना करता आल्या. मला माहिती होतं की, शेवटची ओव्हर नवाज करणार आहे. तो एक स्पिनर आहे. आणि मी त्याच्यासाठी बऱ्याचशा धावा सपोर्ट म्हणून ठेवल्या होत्या. जेणेकरुन त्याच्यावर कुठला दबाव येणार नाही. मात्र माझ्या त्या उर्वरीत बॉलवर कोहलीनं सिक्स लगावले. हे पाहून मला वाईट वाटले. तो इतक्या दूरवर सिक्स मारेल असे वाटले नव्हते.

खरं सांगतो मला जर दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पांड्यानं सिक्स मारले असते तर वाईट वाटले असते पण कोहलीकडून आपल्याला शिक्षा मिळतेय याचाही एक आनंद आहे. तो एक महान फलंदाज आहे. त्याला चकवणं अवघड आहे. तो चांगल्या चेंडूवर देखील सिक्स मारु शकतो. त्याचा क्लासच वेगळा आहे. त्यामुळे तो इतर खेळांडूपेक्षा वेगळा ठरतो हे मला आवर्जुन सांगायचे आहे. आता त्या सामन्यात आम्ही भारताला निष्प्रभ केले होते. पण केवळ कोहलीच्या आक्रमकतेमुळे आम्हाला माघार घ्यावी लागली होती. कोहलीनं माझ्या शेवट्च्या ओव्हरमध्ये दोन सिक्स मारले होते. ते मी विसरु शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court चे माजी न्यायाधीशच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात सर्वोच्च न्यायालयात; नेमकं काय घडलं?

AUS vs BAN 1st Test: बांगलादेश ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर; ऑस्ट्रेलियाला रडवले, कसोटीचा इतिहास-भूगोल बदलणारा सामना...

Western Railway: ३० लाखांच्या गर्दीसमोर पश्चिम रेल्वे हतबल; २,५५९ पदे रिक्त, नियंत्रणासाठी कंत्राटी मनुष्यबळाचा आधार

Marathi News Live Updates : पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांचा आज दिल्लीकडे मोर्चा

UP Freedom Struggle Circuit: स्वातंत्र्यलढ्याच्या आठवणी आता पर्यटकांना अनुभवता येणार; यूपीमध्ये ‘स्वातंत्र्य संग्राम सर्किट’

SCROLL FOR NEXT