Virat Kohli  esakal
क्रीडा

Virat Kohli VIDEO : जेव्हा 'विराट कोहली पॅव्हेलियन'मधून विराटच अवतरतो...

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात सगळीकडे एकच आवाज होता. तो म्हणजे रोहित शर्मा रोहित शर्मा... कारण त्याने नुतनिकरण झालेल्या अरूण जेटली स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात चेंडू पोहचवत प्रेक्षकांना आपल्या सीटवर बसूच दिलं नव्हतं.

मात्र याचदरम्यान भारताची पहिली विकेट पडली. इशान किशन 47 चेंडूत 47 धावा करून माघारी परतला. यानंतर सर्वांची नजर पॅव्हेलियनकडे लागली. पॅव्हेलियनचं नाव काय तर विराट कोहली पॅव्हेलिनय!

या पॅव्हेलियनमधून खुद्द विराट कोहलीच अवतरला. लोकल बॉय आपली एमआरएफची बॅट हातात घेऊन मैदानात उतरला त्यावेळी संपूर्ण दिल्लीचं स्टेडियम विराटमय होऊन गेलं. मैदानावर आता 23000 वनडे धावा करण्याच्या अनुभव उभा होता त्यांनी भारताला मोठा विजय मिळवून देण्यासाठी कंबर कसली होती.

विराट कोहलीने आपल्या होम ग्राऊंडवर आज नाबाद अर्धशतकी खेळी करत भारताच्या मोठ्या विजयात आपला वाटा उचलला. विराट कोहलीचे हे यंदाच्या वर्ल्डकपमधील सलग दुसरे अर्धशतक आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात विराट कोहलीने संघ अडचणीत असताना 116 चेंडूत 85 धावांची खेळी केली होती.

भारताने दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा 8 विकेट्स आणि 15 षटके राखून पराभव करत वर्ल्डकपमधील आपला सलग दुसरा विजय मिळवला. आता भारताचा तिसरा सामना हा 14 ऑक्टोबरला पाकिस्तान सोबत होणार आहे.

हा हाय व्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी आपले दोन्ही सामने जिंकून चांगली सुरूवात केली आहे. त्यामुळे अहमदाबादमधील सामन्यात नक्कीच चांगली चुरस पहावयास मिळेल यात शंका नाही.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jowar-Bajra Price Hike : थंडीची चाहूल, ज्वारी-बाजरीला मागणी; बाजारात क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांची तेजी

Latest Marathi Breaking News Live : नागपूरमध्ये मोठी राजकीय हालचाल! माजी आमदार बळीराम भाऊ शिरस्कार भाजपात प्रवेश; स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण

Cooking In Space: चिनी अंतराळवीरांनी अंतराळात शिजविले अन्न; अवकाश स्थानकात ताजे जेवण बनविण्याचा प्रयोग यशस्वी

Aundh Hospital Theft : औंध रुग्णालयातून 'शेड्यूल-एच' औषधाच्या २० बाटल्या लंपास; वर्ग ४ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Arunachal Monorail: कामेंग खोऱ्यामध्ये धावणार मोनोरेल; अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराच्या ‘गजराज कोअर’ची कमाल

SCROLL FOR NEXT