Virat Kohli congratulates team India after winning test series against West Indies  
क्रीडा

INDvsWI : हे स्पेशल युनिट आहे आणि याचा मला अभिमान आहे : विराट 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारताने विंडीजला व्हाईटवॉश दिला. भारताने दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात चौथ्या दिवशी विंडीजला 257 धावांनी हरविले. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय संघाचे वर्णन स्पेशल युनिट असे केले आहे. तर या स्पेशल युनिटचा मला खूप अभिमान आहे असेही त्याने म्हटले आहे. 

''जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील पहिली मालिका जिंकल्याचा खूप आनंद आहे. संघाने प्रत्येक आघाडीवर सर्वोत्तम कामगिरी केली आहे. हा भारतीय संघ हा स्पेशल युनिट आहे आणि या स्पेशल युनिटचा मला खूप अभिमान आहे,'' अशा शब्दांत त्याने भारतीय संघातील त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. 

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दिलेल्या 468 धावांच्या आव्हानासमोर विंडीजचा दुसरा डाव 210 धावांत आटोपला. भारताचे सलग दुसऱ्या विजयासह 120 गुण झाले.  मालिकेतील 2-0 अशा धवल यशासह भारताने जागतिक कसोटी मालिकेत निर्विवाद आघाडी घेतली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षकांसाठी मोठी बातमी! ३ किलोमीटर परिसरातील २० पट नसलेले नववी-दहावीचे वर्ग होणार बंद; ३ ते ५ कि.मी.वरील शाळांसाठी ‘ही’ सवलत, वाचा...

Satara Drowning: उरमाेडी कालव्‍यात बुडून युवकाचा मृत्‍यू; तीन मित्रांसह गेला हाेता पोहायला, दुपारची वेळ अन् अचानक काय घडलं!

अर्थभान : ‘एफआयआय’ची विक्री की ‘स्मार्ट मनी’चा खेळ?

शेअर बाजार : टिप्स म्युझिक

स्मार्ट सल्ला : क्रेडिट स्कोअर आणि नोकरी...

SCROLL FOR NEXT