Virat Kohli India Vs West Indies 2nd Test esakal
क्रीडा

Virat Kohli : 500 व्या सामन्यात किंग कोहलीने इतिहास रचला! आतापर्यंत कोणाला जमलं नाही ते विराटनं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli India Vs West Indies 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी भारताने आपल्या पहिल्या डावात 5 बाद 288 धावा केल्या. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 80 तर विराट कोहलीने नाबाद 87 धावांची खेळी केली. रविंद्र जडेजा देखील 36 धावा करून नाबाद होता. विंडीजकडून गॅब्रिएल, रोच, होल्डर, वॉरिकन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विराट कोहलीचा हा 500 वा आंतरराष्ट्रीय सामना असून या सामन्यात त्याने अर्धशतकी खेळी केली. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. (Virat Kohli Cricket Records)

याचबरोबर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या जॅक कॅलिसला मागे टाकले. (Most Runs In International Cricket)

विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय स्तरावार सर्वाधिक धावा (25,548) करणारा 5 वा फलंदाज ठरला आहे. तसेच विराट कोहली WTC मध्ये 2000 धावांचा टप्पा पार करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला आहे. (West Indies Vs India News)

पहिल्या सत्रातच शतकी सलामी

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या विंडीजसाठी पहिले सत्र चांगले गेले नाही. भारताची सलामी जोडी यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा यांनी पहिल्याच सत्रात भारताला शतकी (121) मजल मारून दिली.

या सलामी जोडीने 139 धावांची दमदार सलामी दिली. यशस्वीने आपल्या दुसऱ्या सामन्यात 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याला जेसन होल्डरने बाद करत ही जोडी फोडली. त्यामुळे त्याचे पदार्पणाच्या कसोटीत सलग दोन शतके ठोकण्याचे स्वप्न अधुरे राहिले.

दुसऱ्या सत्रात विंडीजचे जोरदार पुनरागमन

दुसऱ्या सत्रात विंडीज भारताची फक्त सलामी जोडी फोडून शांत बसले नाही. रोचने शुभमन गिलचा देखील 10 धावांवर अडसर दूर केला. त्यानंतर पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यात देखील शतकी खेळी करण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या रोहित शर्माचा डावखुरा फिरकी गोलंदाज वारिकनने त्रिफळा उडवला.

भारताची अवस्था बिनबाद 139 धावांवरून 3 बाद 155 धावा अशी झाली असताना विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी सावध फलंदाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गॅब्रिएलने 36 चेंडूत 8 धावा करणाऱ्या अजिंक्य रहाणेचा त्रिफळा उडवला.

तिसरे सत्र विराट कोहलीचे

भारताची दुसऱ्या सत्रात 4 बाद 182 धावा अशी अवस्था झाली असताना विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनी तिसऱ्या सत्रात मात्र टिच्चून फलंदाजी केली. विराट कोहलीला आपले खाते उघडण्यासाठी 20 चेंडू घ्यावे लागले होते. मात्र त्यानंतर त्याने आपला जम बसवत 500 व्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली.

त्याला रविंद्र जडेजाने चांगली साथ दिली. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विराट कोहली 87 धावांपर्यंत पोहचला होता. तर रविंद्र जडेजाने 36 धावा केल्या होत्या. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 106 धावांची नाबाद शतकी भागीदारी रचली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूरग्रस्तांसाठी ५ रुपये मागितले तर..., शेतकऱ्यांकडून वसुलीच्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; कारखान्यांना इशारा

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर अर्धा तास रस्ता रोको आंदोलन

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

SCROLL FOR NEXT