Rohit Sharma on Virat Kohli T20 World Cup sakal
क्रीडा

कर्णधार रोहितचे मोठे वक्तव्य, T20 World Cup मध्ये विराट कोहली करणार ओपनिंग?

कोहलीबद्दल रोहित शर्माची मोठी कमेंट, तो आता....

Kiran Mahanavar

Rohit Sharma on Virat Kohli T20 World Cup : टीम इंडिया 20 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले आहे. तो म्हणाला की, सलामीवीर म्हणून विराट कोहली हा संघासाठी पर्याय आहे. विराटने आशिया कपमध्ये भारताच्या शेवटच्या सामन्यात ओपनिंग करत नाबाद 122 धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधले हे त्याचे पहिले शतक होते.

पत्रकार परिषदेत कोहलीच्या सलामीबाबत रोहित म्हणाला की, विराट कोहली हा आमचा तिसरा सलामीवीर असून तो काही सामन्यांमध्ये सलामी करणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध गेल्या सामन्यात त्यांनी चांगली खेळी खेळली. मी हे देखील स्पष्ट करू इच्छितो की केएल राहुल टी-20 विश्वचषकात आमच्यासाठी सलामी देईल. अनेक वेळा त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष झाले आहे. पण तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या संभ्रमात नाही. आम्हाला माहित आहे की केएल हा दर्जेदार खेळाडू आहे आणि तो चांगली कामगिरी करेल.

आशिया कपमध्ये कोहलीने चमकदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेतील 5 सामन्यात त्याने 276 धावा केल्या. यादरम्यान कोहलीने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली होती. आशिया कप 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या बाबतीत कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळवला जाणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा सामना 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणार आहे. शेवटचा सामना 25 सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. या मालिकेनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका खेळणार आहे.

T20 मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव , हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Municipal Results: साेलापूर जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये भाजप अपेक्षित यशापासून दूर; चार ठिकाणी विजय, उमेदवार निवडीत चुका नडल्या..

Mohan Bhagwat : भारत एक हिंदू राष्ट्र, हेच सत्य,संवैधानिक मंजुरीची आवश्यकता नाही; मोहन भागवत यांचे मोठे विधान

Latest Marathi News Live Update : 'जी राम जी'वर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली स्वाक्षरी; विधेयकाचं कायद्यात झालं रुपांतर

Ajit Pawar: कोणी सुरुवात केली, तर दुसराही करू शकतो; पक्षप्रवेशाबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य, दिल्लीतील वरिष्ठांशी बाेलेन नेमकं काय म्हणाले?

Satara District Municipality Results: सातारा जिल्ह्यात भाजप धुरंधर! दहापैकी सात पालिकांत सत्ता; राष्ट्रवादीला फटका, महाविकासचा धुव्‍वा..

SCROLL FOR NEXT