virat kohli emotional instagram twitter post ms dhoni sakal
क्रीडा

Virat Kohli : आशिया कपपूर्वी कोहलीने धोनीसाठी केली भावनिक पोस्ट; जिंकले सर्वांचे मन, 7+18 ❤️...

विराटने धोनीसाठी एक भावूक पोस्ट लिहून चाहत्यांचे जिंकले मन

Kiran Mahanavar

Virat Kohli Asia Cup 2022 : टीम इंडिया सध्या मिशन अशिया कप 2022 साठी UAE मध्ये आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी 25 ऑगस्टच्या रात्री त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर माजी भारतीय यष्टीरक्षक आणि महान कर्णधार एमएस धोनीसोबत एक फोटो पोस्ट केला. विराटने धोनीसाठी एक पोस्ट लिहून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

इंस्टाग्रामवर धोनीसोबतचा एक जुना फोटो शेअर करत विराट कोहलीने लिहिले की, या व्यक्तीचा विश्वासू उपनियुक्त बनणे हा माझ्या करिअरमधील सर्वात आनंदाचा टप्पा होता. आमची भागीदारी माझ्यासाठी नेहमीच खास असेल. ७+१८' विराट कोहलीच्या या पोस्टला खूप पसंती दिली जात आहे.त्याच्या या पोस्टला आतापर्यंत 23 लाखांहून अधिक लाईक्स इंस्टाग्रामवर मिळाले आहेत.(Virat Kohli Emotional Instagram Twitter Post MS Dhoni)

कोहलीने 2008 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली पदार्पण केले. कोहलीच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या धोनीने नंतर कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवली. 2014 मध्ये कोहली पहिल्यांदाच कसोटीत कर्णधार बनला, त्यानंतर त्याला वनडे आणि टी-20 संघांचेही कर्णधारपद मिळाले.

यूएईमध्ये 27 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या अशिया कप स्पर्धेत भारत 28ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध मोहिमेला सुरुवात करणार आहे. यादरम्यान सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर आहेत जो सध्या वाईट टप्प्यातून जात आहे. नोव्हेंबर 2019 पासून त्याच्या बॅटमधून एकही शतक आले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर 70 शतके झळकावणाऱ्या कोहलीने या काळात अनेक शानदार खेळी खेळल्या मात्र त्याला शतकही करता आले नाही. यावर्षी कोहली आयपीएल 2022 नंतर केवळ इंग्लंड दौऱ्यावरच क्रिकेट खेळला आहे, त्यामुळे T-20 विश्वचषकापूर्वी त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT