Virat Kohli 100th Test
Virat Kohli 100th Test ESAKAL
क्रीडा

VIDEO: विराट म्हणतो, देवाची कृपा म्हणून मी 100 कसोटी खेळलो

अनिरुद्ध संकपाळ

Virat Kohli 100th Test: श्रीलंकेविरूद्धच्या मोहालीत होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याला एक वेगळेच वलय निर्माण झाले आहे. हा कसोटी सामना जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीचा (Virat Kohli) 100 वा कसोटी सामना आहे. विराटने या कसोटी सामन्यात शतक (Century) ठोकून चाहत्यांना खूष करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, विराट कोहलीने आपल्या शंभराव्या कसोटीच्या पूर्वसंध्येला एक व्हिडिओ शेअर करत या कसोटीबाबत आपल्या काय भावना आहे हे सांगितले. हा व्हिडिओ बीसीसीआयने (BCCI Video) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

किंग कोहलीने आपल्या आतापर्यंतच्या आपल्या प्रवासाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. विराट म्हणाला की, 'छोटा असताना मी छोट्या खेळी करत होते. मात्र ज्यावेळी मी 8 वी 9 वीमध्ये गेलो त्यावेळी मी मोठ्या खेळी (Long Innings) करण्याबाबत प्रयत्न करू लागलो. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये येण्यापूर्वीच मी सात ते आठ द्विशतके ठोकली होती. मी ज्यावेळी खेळपट्टीवर जातो त्यावेळी टिकून खेळण्याचा प्रयत्न करतो.'

विराट कोहली या व्हिडिओत पुढे म्हणाला की, 'मी स्वतःला नशीबवान समजतो की मी 100 कसोटी सामने खेळू शकलो देवाची कृपा (God Is Kind) आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप काम केलं. हा माझ्या आणि माझ्या कुटुंबियांसाठी मोठा क्षण आहे.' कसोटी क्रिकेटला अशीच पसंती मिळत राहो असेही विराट कोहली या व्हिडिओत म्हणाला.

विराट कोहली हा भारताकडून 100 कसोटी सामने खेळणारा 12 वा खेळाडू ठरला आहे. या यादीत सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि इशांत शर्मा यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT