ऑस्ट्रेलिया- इंग्लंडची मक्तेदारी मोडून मिताली 'राज'चा अस्त होणार?

ICC Women World Cup Mithali Raj Have Last Chance to Break Australia England Monopoly
ICC Women World Cup Mithali Raj Have Last Chance to Break Australia England Monopoly esakal

आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप (ICC Women World Cup) 4 मार्चपासून सुरू होत आहे. यंदाचा महिला वर्ल्डकप हा न्यूझीलंडमध्ये (New Zealand) होत आहे. हा वर्ल्डकप भारताची (Indian Women Cricket Team) दिग्गज फलंदाज आणि संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) आणि झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) यांचा शेवटचा वर्ल्डकप असेल. यानंतर दोघीही निवृत्त होणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाला या दोघांना वर्ल्डकप जिंकून ऐतिहासिक निरोप देण्याची संधी आहे. मात्र हे जेवढे बोलणे सोपे आहे तितकेच ते अवघड आहे. भारताला आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. 2017 च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून फक्त 9 धावांनी पराभव स्विकारावा लागला होता.

ICC Women World Cup Mithali Raj Have Last Chance to Break Australia England Monopoly
सटकलेल्या विराटने या 5 पत्रकार परिषदेत काढला होता जाळ

महिलांच्या वनडे वर्ल्डकप इतिहासावर नजर टाकली तर यामध्ये ऑस्ट्रेलिया (Australia), इंग्लंड (England) या संघांचा दबदबा कायम दिसून आला आहे. 1973 पासून सुरू झालेल्या महिलांच्या वनडे वर्ल्डकपचे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 6 वेळा विजेतेपद पटकावले आहे. ऑस्ट्रेलियान नंतर इंग्लंडने 4 वेळा वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. तर न्यूझीलंडने 2000 मध्ये एकदा वर्ल्डकप उंचावला आहे. भारत देखील दोन वेळा वर्ल्डकपवर आपली दावेदारी सांगण्याच्या अगदी जवळ पोहचला होता. 2005 आणि 2017 मध्ये भारत वर्ल्डकपच्या फायनलमध्ये (ICC Women World Cup Final) पोहचला होता. दोन्ही वेळा मिताली राजच भारताची कर्णधार होती. आता तिच्यासाठी वर्ल्डकप जिंकण्याची ही शेवटची संधी असेल.

ICC Women World Cup Mithali Raj Have Last Chance to Break Australia England Monopoly
IND Vs PAK: कोहलीचं 'विमेन इन ब्लू'साठी स्पेशल 'चीयर्स'!

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिका या आठ महिला संघाचा समावेश आहे. राऊंड रॉबिन पद्धतीने साखळी फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहे. म्हणजे प्रत्येक संघ साखळी फेरीत 7 सामने खेळेल. त्यातील पहिले चार संघ उपांत्य फेरीत दाखल होतील. 3 एप्रिलला फायनल खेळवण्यात येणार आहे. भारताचा पहिला सामना हा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर 6 मार्चला होणार आहे.

ICC Women World Cup Mithali Raj Have Last Chance to Break Australia England Monopoly
आजच्या दिवशी पाकिस्तानातून क्रिकेटचा बाजार उठला होता!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com