Virat Kohli Fan Breaches Security to Meet Rohit Sharma During India vs England 1st Test at hyderabad 
क्रीडा

Video : हैदाराबादेत सुरक्षेचा फज्जा; रोहित मैदानात येताच विराटची जर्सी घालून फॅन भर मैदानात घुसला अन्...

Kiran Mahanavar

India vs England 1st Test :

हैदाराबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही.

इंग्लंड संघाचा पहिला डाव 246 धावांवर आटोपला. यानंतर भारताकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. यावेळी हैदराबादच्या स्टेडियममध्ये सुरक्षेचा फज्जा उडाला.

खरं तर, टीम इंडियाच्या इनिंगच्या सुरुवातीला हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर एका चाहत्याने सुरक्षा बंदोबस्त तोडला आणि मैदानात एन्ट्री मारली. आणि रोहित शर्मापर्यंत पोहोचला. यानंतर या चाहत्याने रोहित शर्माच्या पाया पडला. मात्र, नंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला पकडून मैदानाबाहेर नेले.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने पहिल्या डावात एक विकेट गमावून 119 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 70 चेंडूत 76 तर शुभमन गिल 43 चेंडूत 14 धावा करून खेळत आहे. भारत अजूनही या धावसंख्येपेक्षा 127 धावांनी मागे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी लाल रंगात! देशांतर्गत गुंतवणूकदारांचा बाजाराला आधार; Meesho चे शेअर घसरले

माहुली घाटात १५० फूट दरीत कोसळली कार; चालकाचा जागीच मृत्यू, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घटना, कारचा चक्काचूर..

IND vs SA 5th T20I: लखनौचा सामना 'धुक्यात' हरवला; आता भारत-दक्षिण आफ्रिका पाचवा सामना कधी व कुठे होणार, ते पाहा...

Nagpur News: डागा रुग्णालयात नवजात शिशूचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ, वैद्यकीय अधीक्षकांचे चौकशीचे आदेश

Viral Video: 'अरे पैसा नही चाहिये', रेल्वे स्टेनशवरील बाप-लेकीची गोड व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT