Tamil Nadu Murder 
क्रीडा

विराट रोहितमुळे दोन चाहत्यांमध्ये खून खराबा, काय आहे प्रकरण?

रोहितच्या चाहत्याने केली RCB ची चेष्टा, मग विराटच्या चाहत्याने बॅटने डोके फोडत केला खुन

Kiran Mahanavar

Tamil Nadu Murder : भारतामध्ये क्रिकेट चाहते आपल्या आवडच्या क्रिकेटपटूसाठी काहीही करायला तयार असतात. भारतामध्ये क्रिकेट चाहत्यांची कमी नाही. अनेकदा आवडत्या क्रिकेटपटूसाठी चाहते आपली हद्द पार करतात, पण तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तामिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यात रोहित शर्माच्या चाहत्याने विराटच्या आरसीबी टीमची खिल्ली उडवली. आरसीबीची चेष्टा केल्याचा राग आल्याने त्याच्या मित्राने त्याची हत्या केली. खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली असून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकारानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मित्र दारूच्या नशेत कोहली आणि रोहित यांच्यात वाद घालत होते. यादरम्यान आरोपी धर्मराजने त्याच्या मित्र विघ्नेशची हत्या केली. पी विघ्नेश वय 24 असे मृताचे नाव आहे. त्याचवेळी आरोपी हा त्याचा मित्र धर्मराज असून त्याचे वय 21 वर्षे आहे. दोघांनाही क्रिकेट खेळात खूप रस होता. मृत विघ्नेश हा आयटीआय पूर्ण केल्यानंतर व्हिसाची वाट पाहत होता.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

तमिळनाडूच्या अरियालूर जिल्ह्यातील पोयूर गावचे रहिवासी असलेले विघ्नेश आणि धर्मराजा चांगले मित्र होते. दोघांनाही क्रिकेटचा खेळ आवडायचा आणि दोघेही अनेकदा क्रिकेटशी संबंधित गोष्टींवर एकमेकांशी वाद घालायचे. विघ्नेश रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सचा चाहता होता, तर धरमराज विराट कोहली आणि आरसीबी संघाचा चाहता होता. मंगळवारी रात्रीही दोघेही सिडको औद्योगिक वसाहतीजवळ क्रिकेटवर गप्पा मारत होते. दोघेही दारूच्या नशेत होते.

बोलता बोलता धर्मराज आणि विघ्नेश अनेकदा त्याची चेष्टा करायचा. मंगळवारीही विघ्नेशने धर्मराजच्या स्टमरची खिल्ली उडवली आणि आरसीबी टीमसह विराट कोहलीवरही अनेक कमेंट्स केल्या. दारूच्या नशेत असलेल्या धर्मराजला हे आवडले नाही. त्याने आपल्याच मित्रावर बाटलीने हल्ला केला. यानंतर क्रिकेटच्या बॅटने त्याच्या डोक्यात वार करून घटनास्थळावरून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी विघ्नेशचा मृतदेह सिडको कारखान्यात कामावर जाणाऱ्या काही मजुरांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Census: जनगणनेसाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याला पुण्यात शिवीगाळ, मुलाला मारहाण; ⁠कर्मचारी संघटनेचा इशारा

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT