Virat Kohli gets angry on runout of Ravindra Jadeja in 1st ODI against West Indies 
क्रीडा

INDvsWI : आता नियम कुठे गेले काय माहित?; जडेजाच्या रनआऊटवर विराट भडकला

वृत्तसंस्था

चेन्नई : भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. विंडीजकडून शाय होप आणि हेटमायर यांच्या दोनशेपेक्षा जास्त धावांच्या भागीदारीमुळे विंडीजला भारतावर सहज विजय मिळवता आला. या दोघांच्या फलंदाजी व्यतिरिक्त भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा रनआऊटही प्रचंड चर्चेत आला.

जडेजा 48व्या षटकात धावबाद झाला तेव्हा मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवलं होतं. मात्र, पॅव्हेलियनमधील सहकाऱ्यांनी तो बाद असल्याचा इशारा केल्यावर विंडीजच्या खेळाडूंनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि मग जडेजाला पंचांनी बाद घोषित केले. 

सामन्यातील 48 व्या षटकात जडेजा वेगाने धावत क्रीजच्या जवळ पोहचला असताना रोस्टन चेजने थेट थ्रो मारला. यावेळी विंडीजच्या खेळाडूंनी अपिल केलं नाही. त्यामुळे मैदानावरील पंचांनीदेखील त्याला बाद दिलं नाही. जडेजा बाद आहे की नाही याबाबद संभ्रम असणाऱ्या विंडीजच्या खेळाडूंना मैदानाबाहेरील सहकाऱ्यांनी तो बाद असल्याचा इशारा केली आणि मग विंडीजच्या खेळाडूंनी अपिल केलं. त्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि जडेजाला बाद ठरविण्यात आले. 

सामन्यानंतर या सर्व प्रकारावर कोहलीने प्रचंड नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, ''क्रिकेटच्या इतिहासात मी आतापर्यंत असं कधीच पाहिलं नाही. मैदानावरील खेळाडूंनी अपिल केलं नव्हतं. जडेजाला पंचांनी नाबाद ठरवलं होतं. त्यानंतर मैदानाबाहेरील खेळाडू रिव्ह्यूबद्दल सांगू शकत नाहीत. आता कुठे गेले क्रिकेटचे नियम,?''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashi Tharoor absence from Rahul Gandhi meeting : राहुल गांधींच्या बैठकीला शशी थरूर सलग तिसऱ्यांदा गैरहजर ; चर्चांना उधाण!

Cabinet Decision: जनगणनेसाठी मोठं बजेट मंजूर; ऊर्जा सुधारणा आणि कृषी क्षेत्रात बदल अन्..., केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Mumbai Viral Video: अरे संसार संसार, पण शौचालयात कसा थाटला? मुंबईत धक्कादायक प्रकार, व्हिडिओ व्हायरल

"माझ्याकडे घरही नव्हतं आणि डॉक्टरांनी.." सोनाली बेंद्रेने सांगितला कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचा अनुभव

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये पर्यावरण रक्षणाला चालना, हरित लवादाच्या निर्णयाचं स्वागत

SCROLL FOR NEXT