India Vs South Africa esakal
क्रीडा

SA vs IND : जिंकायला चाललो होतो मालिका मात्र विराटच्या झुंजार खेळीनंतरही पदरी पडला डावाने पराभव

अनिरुद्ध संकपाळ

India Vs South Africa : यंदाचा दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आलेला भारतीय संघ तगडा असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं होते. मात्र भारताचे हे कागदावरचे वाघ सेंच्युरियनवर ढेर झाले. रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेतील आपला पहिला कसोटी मालिका विजय साजरा करेल असं वाटलं होतं. मात्र पहिल्याच सामन्यात भारतीय संघाचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाल्याने हे स्वप्न स्वप्नच राहिलं आहे.

भारताने केएल राहुलच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात 245 धावा केल्या. रबाडाने भारताचा निम्मा संघ गारद केला होता. त्यानंतर आफ्रिकेने पहिल्या डावात 408 धावा ठोकल्या. डीन एल्गरने 185 तर मार्को येनसेनने नाबाद 83 धावा केल्या.

पहिल्या डावात 163 धावांची आघाडी घेणाऱ्या आफ्रिकेने भारताचा दुसरा डाव 131 धावात गुंडाळला. भारताकडून विराट कोहलीने एकाकी झुंज देत 76 धावा केल्या. मात्र त्याची ही खेळी भारताचा डावाने पराभव रोखू शकली नाही. आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने 4 तर मार्कोने 3 विकेट्स घेतल्या.

पहिले सत्र :

दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी आपला डाव 5 बाद 253 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. पहिल्या सत्रात डीन एल्गर आणि मार्को येनसेन यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलेच दमवले. त्यांनी संघाला 360 धावांपर्यंत पोहचवले. एल्गर आणि येनसेनने पाचव्या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी रचली. अखेर सत्र संपत असताना शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडली. यानंतर आक्रमक खेळणाऱ्या गेराल्ड कॉट्झीला अश्विनने 19 धावांवर बाद केलं.

दुसरे सत्र :

दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगली सुरूवात केली. जसप्रीत बुमराहने रबाडाचा त्रिफळा उडवत आठवा धक्का दिला. मात्र 83 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या मार्को येनसेनने आफ्रिकेला 400 धावांचा टप्पा पार करून दिला. बुमराहने बर्गरचा त्रिफळा उडवत अखेर आफ्रिकाचा डाव 408 धावांवर संपुष्टात आणला.

कर्णधार टेम्बा बावूमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. यानंतर दुसऱ्या डावात देखील भारताची टॉप ऑर्डर ढेपाळली. तिसरे सत्र संपेपर्यंत भारताच्या 3 बाद 63 धावा झाल्या होत्या.

तिसरे सत्र :

तिसरे सत्र सुरू होताच मार्को येनसेनने श्रेयस अय्यरचा 6 धावांवर त्रिफळा उडवत भारताची अवस्था 4 बाद 72 धावा अशी केली. त्यानंतर विराट कोहलीने एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकलं मात्र नांद्रे बर्गरने 3 धक्के दिले.

आफ्रिकेच्या रबाडा, बर्गर आणि येनसेनने भेदक मारा करत भारताची मधली फळी कापून काढली. विराट कोहली शुभमन गिल सोडला तर एकाही फलंदाजीला त्यांनी दुहेरी आकडा गाठून दिला नाही. अखेर भारताचा दुसरा डाव 131 धावात संपुष्टात आला. भारताचा एक डाव आणि 32 धावांनी पराभव झाला. या पराभवाबरोबरच भारताचे आफ्रिकेत ऐतिहासिक मालिका विजयाचे स्वप्न भंगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray Vs BJP : ‘’भाजप 'त्या' थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की...’’; आदित्य ठाकरेंचा सवाल!

जय शाहांनंतर आणखी एक भारतीय ICC मध्ये! नवे CEO झालेले संजोग गुप्ता आहेत तरी कोण?

Latest Maharashtra News Updates : डेटिंग ॲप वर मुलीचे बनावट प्रोफाइल तयार करून तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

SCROLL FOR NEXT