Virat Kohli  
क्रीडा

IND vs ENG: "विराट कोहली, तुला उत्तर द्यावंच लागेल"

विराज भागवत

Ind vs Eng 3rd Test: इंग्लंडच्या खेळाडूंपुढे विराटसेनेची अवस्था बिकट

Ind vs Eng 3rd Test: दुसऱ्या कसोटी (2nd Test) सामन्यात दमदार विजय मिळवणारी टीम इंडिया (Team India) तिसऱ्या कसोटीत ढेपाळली. टॉस (Toss) जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय भारताला मानवला नाही. भारताचा पहिला डाव (1st Innings) दुसऱ्या सत्रात ७८ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी (England) मात्र भारतीय गोलंदाजांची तुफान धुलाई केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने ४००पार मजल मारली. वरच्या चारही फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केल्या. त्यातही कर्णधार जो रूटने (Joe Root) दमदार शतक झळकावले. या साऱ्या घटनानंतर विराटच्या (Virat Kohli) नेतृत्वशैलीवर टीका करण्यात आली असून विराट या साऱ्या गोष्टींची उत्तरं द्यावीच लागतील, अशा शब्दात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने (Michael Vaughan) तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

"दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होत असताना विराटने आपले सर्वोत्तम गोलंदाज मैदानात उतरवायला हवे होते, पण त्याने इशांत शर्माला गोलंदाजी करण्यास सांगितले. पहिल्या दिवसाच्या खेळात इशांतने सर्वात वाईट गोलंदाजी केली होती. त्याला भेदक मारा करताच आला नव्हता. अशा परिस्थितीत विराटने त्याला गोलंदाजी देणं समजण्यापलिकडचं होतं. विराटने जसप्रीत बुमराहला एका बाजूने गोलंदाजी देणं आवश्यक होतं. त्यानी तसं का केलं नाही, याचं त्याला उत्तर द्यावं लागेल. तसेच, शमीसारखा स्विंगमास्टर गोलंदाजही नवीन चेंडूने गोलंदाजी का करत नाही याचंही उत्तर विराटला द्यावंच लागेल", असं रोखठोक मत वॉनने व्यक्त केलं.

"चांगल्या संघाचं एक लक्षण म्हणजे ते कोणत्याही परिस्थितीत पटकन मिसळून जातात. भारतीय संघ हा सर्वोत्तम आहे. पण त्यांना त्यांच्याच पद्धतीचा खेळ करून सर्व सामने जिंकता येणार नाहीत. पिच आणि वातावरण कसं आहे ते पाहून आपल्या संघात किंवा खेळाच्या पद्धतीत बदल करणं भारतीय संघाला गरजेचंच आहे. नाहीतर तुम्हाला यश मिळणं कठीण होऊन बसेल", असा सल्लादेखील त्याने दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT