Virat Kohli Record eSakal
क्रीडा

Virat Kohli : इंटरनेटवरही 'कोहली'च किंग! ठरला यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर

विशेष म्हणजे, प्रसिद्ध के-पॉप सिंगर व्ही आणि जुंग कुक यांनाही विराट कोहलीने मागे टाकलं आहे.

Sudesh

Most Searched Cricketer : यंदाच्या आयसीसी मेन्स क्रिकेट वर्ल्डकपमध्ये 'मॅन ऑफ दि टूर्नामेंट' ठरलेल्या विराट कोहलीला त्याचे चाहते 'किंग कोहली' म्हणून ओळखतात. क्रिकेटच्या मैदानावरचा राजा असणारा कोहली हा इंटरनेटवर देखील 'किंग' असल्याचं स्पष्ट झालं आहे. या वर्षात गुगलवर सर्वाधिक सर्च केला गेलेला क्रिकेटर म्हणून विराट कोहलीचं नाव समोर आलं आहे.

'रन मशीन', 'चेज मास्टर' अशा नावांनी ओळखला जाणारा कोहली हा सध्या जगातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटर आहे यात शंका नाही. गुगल सर्चच्या अहवालामुळे तर हे स्पष्टच झालं आहे. इन्स्टाग्रामवर देखील कोहलीच सर्वाधिक फॉलोवर्स असणारा आशियाई व्यक्ती आहे. त्याचे याठिकाणी तब्बल 259 मिलियन फॉलोवर्स आहेत.

आशियामध्येही कोहलीच टॉप

यासोबतच काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आलेला आशियाई व्यक्ती देखील विराट कोहलीच ठरला आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध के-पॉप सिंगर व्ही (BTS V) आणि जुंग कुक (Jungkook) यांनाही विराट कोहलीने मागे टाकलं आहे. हे सिंगर्स BTS या साऊथ-कोरियन ग्रुपचे मेंबर्स आहेत. जगभरात यांचे कोट्यवधी फॅन्स आहेत. मात्र, कोहलीने त्यांनाही मागे टाकलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT