Virat Kohli  sakal
क्रीडा

Virat Kohli : वर्ल्डकपनंतर विराट खेळलाय चारच सामने ; आता थेट ‘आयपीएल’मध्ये उतरण्याची शक्यता

एरवी प्रत्येक सामन्यात खेळण्यास उत्सुक असलेला आणि तेवढ्याच प्रकर्षाने खेळणारा सुपरस्टार विराट कोहली आता मैदानावर कमी आणि सुटीवर अधिक काळ दिसून येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : एरवी प्रत्येक सामन्यात खेळण्यास उत्सुक असलेला आणि तेवढ्याच प्रकर्षाने खेळणारा सुपरस्टार विराट कोहली आता मैदानावर कमी आणि सुटीवर अधिक काळ दिसून येत आहे. तीन महिन्यांत तो दोन कसोटी आणि दोन ‘ट्वेन्टी-२०’ सामने एवढेच चार सामने खेळला आहे.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबादमध्ये झाला होता. त्यानंतर आजपर्यंत विराट कोहली दोन कसोटी आणि दोन ट्वेन्टी-२० लढतीतच खेळला आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून त्याने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली होती. पुढच्या तिन्ही सामन्यातही तो खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे विराट आता थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसून येईल.

२०२३

विश्रांती : ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच टी-२० सामन्यांची मालिका

विश्रांती : दक्षिण आफ्रिकेतील तीन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका

२०२३-२४

सहभाग : आफ्रिकेतील दोन कसोटी सामने

२०२४

अनुपलब्ध : अफगाणविरुद्धचा पहिला टी-२० सामना

सहभाग : अफगाणिस्ताविरुद्धचे दोन टी-२० सामने

माघार : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी आणि कदाचित पुढचे तिन्ही सामने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, ८ प्रभागांची नावे बदलली

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT