Virat Kohli Most Runs Record in England esakal
क्रीडा

शतक जाऊ द्या, विराटने पूर्ण सिरीजमध्ये जरी 101 धावा काढल्या तरी...

कोहलीने तीन वनडेत 101 धावा केल्या तर तो हा विक्रम मोडू शकतो

Kiran Mahanavar

Virat Kohli Most Runs Record in England : भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. याशिवाय आता त्यांना दुहेरी फटकाही बसला आहे. अखेरच्या टी-20 लढतीत विराटच्या मांडीला दुखापत झाली. ही दुखापत क्षेत्ररक्षण करताना झाली, की फलंदाजी करताना, याबाबत काही सांगण्यात आले नाही. अशा परिस्थितीत आता त्याच्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळण्यावर सस्पेंस आहे.

विराट कोहली एका मोठ्या विक्रमाच्या जवळ आहे. हा विक्रम झाला तर कुठेतरी त्यांचा आत्मविश्वासही वाढेल. गेली अडीच वर्षे शतकासाठी कोहलीला हा विक्रम करण्यासाठी फार काही करावे लागणार नाही. त्याला एका सामन्यात शतक झळकावता आले नाही, तर काही फरक पडत नाही, जर कोहलीने तीन वनडेत 101 धावा केल्या तर तो हा विक्रम मोडू शकतो.(Virat Kohli Most Runs Record in England ODI Series Kohli Break Rahul Dravid Record)

इंग्लंडच्या भूमीवर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. यामध्ये भारताचा माजी दिग्गज राहुल द्रविड अव्वल आहे. द्रविडने इंग्लंडच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये 648 धावा केल्या आहेत. या यादीत विराट कोहली सहाव्या क्रमांकावर असून त्याने आतापर्यंत 14 सामन्यांत 548 धावा केल्या आहेत. म्हणजेच कोहली अगदी 100 धावांनी मागे आहे. जर त्याने 101 धावा केल्या तर तो द्रविडचा विक्रम मोडेल शकतो.

  • राहुल द्रविड - 20 सामने - 648 धावा

  • सचिन तेंडुलकर - 17 सामने - 639 धावा

  • एमएस धोनी - 21 सामने - 613 धावा

  • इयान बेल - 15 सामने - 594 धावा

  • सौरव गांगुली - 16 सामने - 565 धावा

  • विराट कोहली - 14 सामने - 548 धावा

विराट कोहली दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. बर्मिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यादरम्यान कोहलीला ही दुखापत झाली होती. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

Marathi News Live Updates : आज स्वातंत्र्यदिनी अमृतसरमधील अटारी-वाघा सीमेवर 'बीटिंग रिट्रीट' समारंभ पार पडला

Onam 2026: केरळचा सर्वात मोठा उत्सव; थिरुवोणमची पर्वणी! जाणून घ्या 'ओणम' आणि मल्याळी संस्कृतीचे खास महत्त्व!

SCROLL FOR NEXT